आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्रकाचे वाटप:रायपूर येथे आठवडी बाजारात हिवताप विषयी जागृती ; रोग नियंत्रणाबाबत पत्रकाचे वाटप

बुलडाणा20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर येथील आठवडी बाजारात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने १४ जून रोजी आरोग्य कर्मचाऱ्यांनी हिवतापाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. यावेळी दुकानदार, भाजीपाला विक्रेता यांना कीटकजन्य रोग नियंत्रण बाबत सविस्तर माहिती देऊन माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. डी. सरपाते, वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एस. तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य कर्मचाऱ्यांनी हिवतापाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. यावेळी रायपूर येथे मंगळवारी आठवडी बाजार भरतो या बाजारासाठी गावाला लागून असलेल्या दहा ते पंधरा खेड्यातील दुकानदार भाजीपाला विक्रेते, ग्रामस्थ, नागरिक, विविध वस्तू खरेदी करण्यासाठी येतात. त्यामुळे कीटकजन्य आजाराबाबत त्यांना माहिती व्हावी, यासाठी रायपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ.विजय पवार, प्रयोगशाळा अधिकारी विपिन राजपूत, आरोग्य सहाय्यक आर.एस.जाधव , आरोग्य सेवक प्रदीप मेथे, आय.जी.राठोड, खंडागळे यांनी आठवडी बाजारातील व्यवसायीक, नागरिकांना कीटकजन्य रोग नियंत्रणाबाबत माहिती दिली. यावेळी त्यांना माहिती पत्रकाची आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने वाटप करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायतमध्ये सचिव बी.एस.बाहेकर, ग्रामपंचायत सदस्य यांना शौचालयाच्या पाइपला जाळ्या बसवण्याबाबत मार्गदर्शन केले.

लक्षणे आढळल्यास रुग्णांनी उपचार करावा दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला, ताप असल्यास किंवा वजनात घट झाल्यास थुंकी द्वारे रक्त पडल्यास अशा रुग्णाने तात्काळ आरोग्य केंद्र किंवा इतर शासकीय रुग्णालयात जाऊन तातडीने उपचार करून घ्यावा. डॉ. डी. एस. तायडे वैद्यकीय अधिकारी रायपूर.

बातम्या आणखी आहेत...