आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लघुचित्रपट:लघुचित्रपटातून गोवर, रुबेलाबाबत जनजागृती

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात गोवर रुबेला या आजाराने डोके वर काढले असून या आजार व लसीकरण संदर्भात जनजागृती करण्यासाठी वन्य जीव सोयरेंच्या सदस्यांनी लघु चित्रपटाची निर्मिती केली आहे. एवढेच नव्हे तर हा चित्रपट समाज माध्यमावर प्रकाशित करण्यात आला आहे. या आजाराला आळा घालण्यासाठी नागरिकांनी हा चित्रपट आवर्जून पाहावा, असे आवाहन वन्य जीव सोयरेंच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यात वाढत असलेल्या गोवर या आजाराच्या रुग्ण संख्येचा विचार करता आरोग्य विभागाकडून ९ महीने ते ५ वर्ष बालकांचा गोवर रुबेला लसीचाअर्थात एम.आर. लसीचा पहिला किंवा दुसरा अथवा दोन्ही डोस राहिलेल्या बालकांना मोहिमेत डोस देण्यात येणार आहे. तरी सर्व पालकांनी ९ महीने ते ५ वर्ष बालकांना एम. आर. लसीकरण करून घ्यावे.

दिवसागणिक वाढत असलेल्या गोवर रुग्णाची संख्या लक्षात घेता वन्यजीव सोयरेंच्या सदस्यांनी गोरुल पुन्हा लघुचित्रपट जनजागृतीसाठी तयार करुन सोशल मीडियावर प्रसारित केला आहे. वन्यजीव सोयरे प्रस्तुत गोरूल पून्हा राज्यात वाढत असलेल्या गोवर आजारावर जनजागृती करणारा लघुचित्रपट असून या चित्रपटात अभिनेता राजीवकुमार तायडे, शाम राजपूत, नितीन धंदर, गजेंद्रसिंग राजपूत, शेख आरिफ शेख रज्जाक, जालिंदर तायडे या कलाकारांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तर सुरेश दांडगे यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले असून कथा, पटकथा, संकल्पना, लेखन, कैमरा, दिग्दर्शन वन्यजीव सोयरेंचे नितीन श्रीवास्तव यांनी केले आहे. या लघुचित्रपटाचे चित्रीकरण क्रीडा संकुल परिसरात करण्यात आले असून जास्तीत जास्त लोकांनी लघुचित्रपट पाहावा, असे आवाहन वन्यजीव सोयरे परिवारा कडून करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...