आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहीम:आदिवासी सन्मान परिषदेसाठी मेहकर येथे जनजागृती मोहीम

मेहकर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महानायक बिरसा मुंडा यांच्या स्मृती दिनानिमित्त बिरसा क्रांती दल द्वारा आयोजित आदिवासी सन्मान परिषदेची मेहकर येथे नुकतीच बैठक पार पडली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बिरसा मुंडा जिल्हाध्यक्ष भगवानराव कोकाटे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्य संघटक विष्णू कोवे, संतोष ठाकरे उपस्थित होते.

येत्या ९ जून रोजी आदिवासी सन्मान परिषद यवतमाळ या ठिकाणी घेण्यात येणार आहे. दरम्यान या सन्मान परिषदेसाठी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उपरोक्त मान्यवरांनी केले. यावेळी बिरसा क्रांती दलाच्या महिला अध्यक्षा म्हणून ज्योती पुंडलिक करवते यांची निवड करण्यात आली.

यावेळी ज्योती लेकुरवाळे, कविता झळके, शिला मोरे, नंदा चवरे, चित्रा खिल्लारे आदी महिला सदस्यांची उपस्थिती होती. तर वैजिनाथ चवरे, मंगेश गेडाम, पंकज पेंदाम, राजेश कोडपे, पांडुरंग कुडमेथे, नारायण झळके, माधव चाफे, संतोष तनपुरे, रणजित कोठुळे, संभाजी खुळे, वासुदेव भोकरे, दिलीप माघडे, माणिक गिऱ्हे,शालिक खिलारे, राजू अंभोरे, पुंडलिक करवते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वैजिनाथ चवरे यांनी केले. कार्यक्रमाला अनेकांनी उपस्थिती लावली होती.

बातम्या आणखी आहेत...