आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खराब रस्ता:मलकापूर-घिर्णी रस्त्याची दुरवस्था; तत्काळ काम करा

मलकापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मलकापूर ते घिर्णी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याने ये जा करणाऱ्या भाविकांना त्रास सहन करावी लागत आहे. या रस्त्याचे काम तात्काळ सुरु करण्यात यावे, या मागणीचे निवेदन आज १ जानेवारी रोजी शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक चांभारे पाटील यांनी जि.प.बांधकाम मलकापूर उपविभागाच्या अधिकाऱ्यांकडे दिले आहे.

घिर्णी येथे संत गजानन महाराजांचे मंदिर आहे. या मंदिरात दर्शनाकरिता येणाऱ्या भाविक भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दर गुरुवारी मलकापूर येथून नित्यनियमाने वारी व भाविक मलकापूर ते घिर्णी रस्त्याने जातात. या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मलकापूर ते घिर्णी रस्त्याचे काम तत्काळ सुरु करावे अन्यथा शिवसेनेच्या वतीने विभागीय कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाअंती देण्यात आला आहे.

निवेदन देतेवेळी यावेळी तालुकाप्रमुख दिपक चांभारे पाटील यांच्यासह शहर प्रमुख गजानन ठोसर, हरिदास गणबास, अनिल श्रीखंडे, पांडुरंग चिम, रामराव तवेकर, राम थोरबोले, बाळू खोलखरे, शेख यासीन, कृष्णा महेसरे, मोहम्मद इसाक तेली, हसन गौरी, जुनेद रसूल चव्हाण, वसीम खान तस्लिम खान, अस्लम खान रसूल खान, शे.यासिन शे. रशीद, मो.आसिफ गौरी, श्रीधर पाटील, झायद खान अरशद खान, सलीम आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...