आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आग:गोठ्याला आग; चाऱ्यासह साहित्य खाक

चिखलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गाव शिवारात बांधलेल्या गोठ्याला अचानक आग लागली. या आगीत जनावरांच्या चाऱ्यासह शेतीउपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेत शेतकऱ्याचे जवळपास अडीच लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही घटना आज ४ जून रोजी सकाळी साडे अकरा वाजता पिंपळवाडी शिवारात घडली.

तालुक्यातील पिंपळवाडी येथील शेतकरी लिंबाजी नारायण वरपे यांनी जनावरांसाठी व शेतीउपयोगी साहित्य ठेवण्यासाठी गाव शिवारात टीन पत्र्याचा गोठा बांधला होता. या गोठ्यात त्यांनी पाईप, इलेक्ट्रिक मोटर, दोन पेट्रोल पंप, सोयबीन कुटार, तीन हजार पेंढी चारा, शेती अवजारे व औषध फवारणी यंत्र ठेवले होते. दरम्यान आज सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास अचानक गोठ्याला आग लागली. हवेचा जोर अधिक असल्याने काही वेळातच या आगीने संपुर्ण गोठ्याला आपल्या कवेत घेतले.

या आगीत ३८ हजार रुपये किंमतीचे ४७ पाईप, ३२ हजार रुपये किंमतीची इलेक्ट्रिक मोटर, १६ हजार रुपये किंमतीचे पंप, ५० हजार ७०० रुपये किंमतीची टिनपत्रे, १७ हजार रुपये किंमतीची कुट्टी, ९ हजार रुपये किंमतीचे सोयाबीन कुटार, ४२ हजार रुपये किमतीचा शाळुचा चारा,१४ हजार रुपये किंमतीची शेती अवजारे, १३ हजार रुपये किंमतीचे फवारणी पंप यासह इतर साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेत शेतकऱ्याचे जवळपास साडे तीन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. घटनेबाबत माहिती मिळताच महसुल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन नुकसानीचा पंचनामा केला आहे.

बातम्या आणखी आहेत...