आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:परिश्रम, चिकाटी ठेवून स्वावलंबी बना; विजय अंभोरे यांचे आवाहन

खामगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मातंग समाजातील युवक युवतींनी परिश्रम घेऊन चिकाटी व जिद्द ठेवून स्वावलंबी बनवण्याचा संकल्प करणे आज काळाची गरज आहे. स्पर्धेच्या युगात आज शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपण शिक्षण घेणे गरजेचे आहे त्यासोबतच परिश्रमी जिद्द व चिकाटी असणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे मातंग समाजाच्या युवक-युवतींनी याचा गांभीर्याने विचार करून स्वत:चा व समाजाच्या विकासाचे लक्ष गाठता येईल, असे आवाहन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विजय अंभोरे यांनी केले.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम मागील १ ऑगस्टपासून एक महिन्यापर्यंत जिल्ह्यातील विविध ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा समारोप २८ ऑगस्ट रोजी शहरात करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी साहित्यिक प्रा. डॉ. सुरेशराव चौथाईवाले यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या लिखाणावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते संताराम तायडे, बी.के.खरात एस.के. नृपनारायण, भगवान गायकवाड, मंगलाताई निकाळजे, एस.एस.बापट, ओमप्रकाश नाटेकर, मनीष पाटोळे, रमेश इंगळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन जिल्हाध्यक्ष वामनराव गुडेकर यांनी तर आभार कृष्णा नाटेकर यांनी केले. कार्यक्रमाला गजानन सोनोने, लक्ष्मण गवई, विजय काटोले, जी.टी.जाधव, विजय सकळकडे, उमेश बाभुळकर, श्रीराम गायकवाड, रमेश सकळकळे, नामदेवराव जाधव, शंकर वाघ, सुनील नाटेकर, सुभाष वानखडे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...