आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण‎:दुकानात काम करण्यास नकार देणाऱ्या युवकास मारहाण‎

खामगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेजारच्या कापड‎ दुकानात काम करणाऱ्या नकार‎ देणाऱ्या युवकास दुसऱ्या दुकान‎ मालकाने मारहाण केल्याची घटना मेन‎ रोडवरील शिव कलेक्शनमध्ये घडली.‎ याबाबत शिव कलेक्शन कापड‎ दुकानाचे मालक सागर विश्वनाथ‎ धनोकार यांनी शहर पोलिसांत‎ दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या दुकानात‎ काम करणारा आशिष मिलिंद‎ वानखडे वय १८ यास शेजारच्या‎ कपडा दुकानाचे मालक हाफीज‎ बुरानी याने तू माझ्या दुकानात काम‎ कर. मी तुला जास्त पगार देतो, असे‎ म्हटले.

यावेळी आशिषने काम‎ करण्यास नकार दिला असता बुरानी व‎ अविनाश या दोघांनी आशिषला‎ मारहाण करून जखमी केले. तसेच‎ शिविगाळ करून जीवे मारण्याची‎ धमकी दिली. या तक्रारीवरून‎ पोलिसांनी हाफीज बुरानी व अविनाश‎ या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला‎ आहे. पुढील तपास शहर पोलिस‎ करीत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...