आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रींच्या चरणी नतमस्तक:श्रींचे दर्शन घेत नव्या वर्षाची सुरुवात

शेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चला शेगावासी जाऊ गजानन संता पाहू संत म्हणता होतील भेटी आनंदी नाचे संतनगरी हे भक्तांचे माहेर सर्व सुखाचे भांडार भक्तांचे माहेर,

सर्व सुखाचे भांडार असलेल्या शेगावात श्रींच्या समाधी दर्शनाने श्रींच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या नवीन वर्षाची सुरुवात श्रींच्या आशीर्वादाने केली आहे. संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन हजारो भक्तांनी इंग्रजी नवीन वर्षाचे स्वागत केले. यावर्षी कोरोनाचे कोणतेही प्रतिबंधक नियम नसल्याने आज १ जानेवारी रोजी राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो भाविकांनी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. त्याचप्रमाणे श्री दास गणू महाराज लिखित श्री गजानन विजय ग्रंथाचे २१ अध्याय वाचन करून पारायण केले.

श्रींच्या समाधी दर्शनासाठी सुमारे ५ ते ६ तास श्रींच्या समाधी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी भाविक दर्शन बारीत शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत लागून श्रींचे मनोभावे दर्शन घेत होते. श्रींच्या समाधी दर्शनाची रांग आनंद विसावापासून सकाळी लागलेली होती. यानंतर हजारो भाविकांनी श्रींच्या महाप्रसादाचा सुद्धा लाभ घेतला. श्री मंदिर परिसरात झालेल्या गर्दीमुळे कोणत्याही भाविकांना श्रींचे दर्शन घेण्यास असुविधा होऊ नये याकरता मंदिर परिसरात ठिकठिकाणी सेवाधारी वर्गाने सेवा दिली. शेगावात इतरत्र रस्त्याच्या कडेला मिळेल त्या जागी मोटारसायकली व वाहने उभी होती.

भाविकांमुळे राज्य परिवहन महामंडळाला मोठा फायदा झाला. यासह अनेक बेरोजगार व लहान व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध झाला.भाविकांनी गर्दी केल्यामुळे हार फुल विक्रेत्यांचा सोबतच चहा, विक्रेते व नाश्ता तसेच विविध खेळणे, वस्तू विक्रेते लहान व्यावसायिकांकडे खरेदीदारांंनी गर्दी केल्याचे दिसून येत होते .

बातम्या आणखी आहेत...