आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट:शिवनी आरमाळ धरण परिसरातील झाडांच्या फांद्या तोडण्यास सुरूवात ; धोकादायक ठिकाणाजवळ अपघाताचे प्रमाणही होणार कमी.

अंढेरा7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंढेरा ते मलकापूर पांग्रा या रस्त्यावर शिवनी आरमाळ हे गाव असून येथील धरण परिसरातील रस्त्याचा दुतर्फा असलेल्या झाडाझुडपांनी श्वास कोंडला होता. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढीस लागल्याने धोकादायक ठिकाणाजवळील झाडांच्या फांद्या तोडण्याची गजर निर्माण झाली होती. दरम्यान, १३ मार्च पासून शिवनी आरमाळ धरण परिसरातील झाडांच्या फांद्या तोडण्यात सुरवात झाली असून त्यामुळे धोकादायक ठिकाणाजवळ अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे.

शिवनी आरमाळ धरण परिसरातील रस्त्याचा झाडाझुडपांनी कोंडला मार्ग या मथळ्याखाली दैनिक दिव्य मराठीच्या ३ मार्च रोजीच्या अंकात सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची संबधित विभागाने दखल घेत फांद्या तोडण्यास सुरूवात केली आहे. शिवनी आरमाळ येथील धरण परिसरातील रस्त्याने मलकापूर पांग्रा, बिबी, दुसरबीड, लोणार कडे जाता येते. तसेच जवळच असलेले सावखेड नागरे, मेंडगाव, बायगाव बुद्रुक, पाडळी शिंदेसह शिवनी आरमाळ गावात जाता येते. या रस्त्याचे मागील काही दिवसांपूर्वी डांबरीकरणाचे देखील काम पूर्णत्वास गेले आहे. धरण परिसरातून गेलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठमोठी काटेरी बाभळी व इतर झाडे आहे.

या झाडांच्या फांद्या रस्त्यावर आल्या असल्याने वाहन धारकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. दरम्यान, समोरून येणारे वाहन देखील या झाडांच्या फांद्यामुळे दिसत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढीस लागले होते. तसेच धोकादायक वळण मार्ग असल्याने वाहनधारकांची तारांबळ उडत असल्याने रात्री या मार्गाने प्रवास करताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. १३ मार्च पासून धरण परिसरातील झाडांच्या फांद्या छाटण्यास सुरवात झाल्याने प्रवाशांना आता प्रवास करताना मोठा दिलासा मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...