आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हे दाखल‎:मिरवणुकीत नाचताना धक्का लागल्याने मारहाण‎

मोताळा‎15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवजयंतीच्या मिरवणुकीत नाचत‎ असताना धक्का लागल्याच्या‎ कारणावरून मोताळा शहरातील दोन‎ युवकांमध्ये वाद झाला. वादाचे‎ पर्यावसान हाणामारीत झाले. या‎ हाणामारीत एक जण गंभीररीत्या‎ जखमी झाला आहे. या प्रकरणी‎ तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी तीन‎ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही‎ घटना शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास‎ घडली.‎ शहरातील संतोष राजाराम चव्हाण‎ यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार,‎ शुक्रवारी सायंकाळी शहरात‎ शिवजयंतीची मिरवणूक काढण्यात‎ आली. या मिरवणुकीत महेंद्र नाचत‎ असताना निखिल गावंडे या मुलास‎ त्याचा धक्का लागला.

या‎ कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची‎ झाली. याची माहिती मिळताच आम्ही‎ दोन्ही बापलेक निखिलचे वडील‎ विनोद गावंडे यास समजावण्यास गेलो‎ असता विनोद गावंडे यांच्यासह त्यांचा‎ मुलगा निखिल व मनोज गावंडे यांनी‎ शिवीगाळ करून मारहाण केली. तर‎ निखिल गावंडे याने लोखंडी रॉडने‎ मारहाण केली. तसेच डोक्यात फरशी‎ मारून जखमी करत जीवे मारण्याची‎ धमकी दिली. या तक्रारीवरून‎ पोलिसांनी निखिल गावंडे, विनोद‎ गावंडे व मनोज गावंडे या तीन‎ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील‎ तपास पीएसआय विजयकुमार घुले‎ करत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...