आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गटाचे लाभार्थी:ऑक्टोबरच्या अनुदानाच्या प्रतिक्षेत तिन्ही गटाचे लाभार्थी

बुलडाणा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाने आता संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना लाभार्थींमध्ये सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती असे गट पाडून अनुदान वितरणाला सुरुवात केली असून या लाभार्थींना पुरेल इतके अनुदान सध्या जिल्ह्याला उपलब्ध झाले आहे. आतापर्यंत एप्रिल ते सप्टेंबर पर्यंतचे अनुदान वितरीत झाले असले तरी ऑक्टोबर महिन्याचे अनुदान अद्याप वितरीत करण्यात आलेले नाही. ऑक्टोबर महिन्याचे अनुदान प्रोसेसमध्ये असल्याचे संजय गांधी योजना कार्यालयाने सांगितले. सहा योजनांच्या माध्यमातून एक लाख ८६ हजार ७९३ लाभार्थी अनुदानाचा लाभ घेत आहेत.

जिल्ह्यात संजय गांधी निराधार योजनेचे सर्वसाधारण गटाच्या लाभार्थींना एप्रिल ते सप्टेंबर पर्यंत २६ कोटी ८४ लाख ८९ हजार २०० रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. अनुसूचित जातीच्या लाभार्थींना सहा कोटी २८ लाख ९९ हजार ९०० रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. अनुसूचित जमातीच्या लाभार्थींना ५७ लाख ९८ हजार ६०० रुपये वाटप करण्यात आले आहे.

अजून ऑक्टोबरचे अनुदान मिळणे बाकी आहे. अजून डिसेंबर पर्यंत पुरेल एवढे पुरेसा निधी संजय गांधी निराधार योजनेच्या सर्वसाधारण लाभार्थींकरता जिल्ह्याकडे उपलब्ध आहे. श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या अनुसूचित जातीच्या लाभार्थींना १२ लाख ९९ हजार २९ हजार ५०० रुपयांचे वाटप करण्यात आले आहे तर अनुसूचित जमातीच्या लाभार्थींना एक कोटी ११ लाख ७८ हजार २०० रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. सर्वसाधारण लाभार्थींना ५८ कोटी ६० लाख २६ हजार ९०० रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

संजय गांधी निराधारचे लाभार्थी वाटप असे
सर्वसाधारण गटाचे बुलडाणा तालुक्यात तीन कोटी ७१ लाख ७६ हजार ७००, चिखली तालुक्यात तीन कोटी ३५ लाख १५ हजार ३००, देऊळगाव राजा तालुक्यात एक कोटी २१ लाख ३१ हजार ४००, जळगाव जामोद तालुक्यात एक कोटी ९८ लाख ७९ हजार ७००, खामगाव दोन कोटी ३१ लाख १५ हजार ४००, मलकापूर दोन कोटी २२ लाख ६६ हजार ८००, मेहकर दोन कोटी २८ लाख ६९ हजार २००, लोणार तालुक्यात एक कोटी ६२ लाख पाच हजार ७००, मोताळा तालुक्यात दोन कोटी २४ लाख १६ हजार ७००, नांदुरा तालुक्यात एक कोटी ८९ लाख दोन हजार ७००, संग्रामपूर तालुक्यात एक कोटी १३ लाख ६२ हजार १००, शेगाव तालुक्यात एक कोटी ३३ लाख ४९ हजार ३००, सिंदखेड राजा तालुक्यात एक कोटी ५२ लाख ९८ हजार २०० रुपयांचे वाटप करण्यात आले.

असे आहेत लाभार्थी
संजय गांधी निराधार योजनेत सर्वसाधारणचे ४६,९७६, अनुसूचित जातीचे १२७३०, अनुसूचित जमातीचे १३६१ तर श्रावण बाळ योजनेत सर्वसाधारणचे १०५४६०, अनुसूचित जातीचे २५५२०, अनुसूचित जमातीचे २३५१, असे एकुण एक लाख ३३ हजार ३३१ लाभार्थी आहेत. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेचे ४९७८०, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेचे २७१५ तर इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेचे ८७७ लाभार्थी आहेत.

बातम्या आणखी आहेत...