आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विष प्राशन:प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा‎ योजने अंतर्गत दोन लाखांचा लाभ‎

अंढेरा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रधानमंत्री जीवन ज्योती‎ विमा योजने अंतर्गत आत्महत्या‎ ग्रस्त कुटुंबाला दोन लाख रुपयांचा‎ लाभ देण्यात आला आहे.‎ येथील विदर्भ कोकण ग्रामीण‎ बॅक शाखे अंतर्गत येणार्या सेवानगर‎ येथील रहिवासी तथा शाखेचे‎ खातेदार सतीश नंदू राठोड यांनी‎ विष प्राशन करून आत्महत्या केली‎ होती. शाखा व्यवस्थापक विनायक‎ वेदपाठक यांनी मृताच्या पत्नीचे‎ आवश्यक ते सर्व कागदपत्रे मागवून‎ प्रस्ताव कंपनीकडे पाठवला होता.‎

हा प्रस्ताव परिपूर्ण असल्याने‎ प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा‎ योजने अंतर्गत मिळणारी दोन लाख‎ रुपये रक्कम ही लगेच राठोड यांच्या‎ खात्यात जमा झाली आहे. २८‎ फेब्रुवारी रोजी विदर्भ कोकण‎ ग्रामीण बँक शाखेचे व्यवस्थापक व‎ त्यांच्या सहकाऱ्यांनी ही रक्कम‎ मृताची पत्नी गीता सतीश राठोड‎ यांच्या खात्यात जमा केली. यावेळी‎ व्यवस्थापक विनायक वेदपाठक,‎ रोखपाल सुधीर लंके, सहाय्यक‎ व्यवस्थापक महेश शेजोळ, गंगाधर‎ डोईफोडे, उमेश राठोड, जगदीश‎ तेजनकर उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...