आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:आदिवासी प्रकल्पस्तरीय समितीवर पुन्हा भगवान कोकाटे

लोणारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आदिवासी समाजाचा विकास व्हावा, यासाठी शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यातील आदिवासी नेते भगवान कोकाटे यांची रद्द झालेली नियुक्ती पुन्हा शासनाने एका आदेशान्वये कायम ठेवली आहे.

शासनाच्या एका आदेशान्वये चार-पाच महिन्यांपूर्वी अकोला येथील आदिवासी प्रकल्पस्तरीय समितीमध्ये खासदार प्रतापराव जाधव व आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्या शिफारशीवरून जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे भगवान कोकाटे यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

कुठलेही कारण नसताना आपली नियुक्ती रद्द केल्यामुळे भगवान कोकाटे यांनी खासदार प्रतापराव जाधव व आमदार डॉ. संजय रायमूलकर यांची भेट घेऊन त्यांना शासन निर्णया मध्ये केलेल्या बदलाची माहिती दिली. याची दखल घेत आमदार डॉ. संजय रायमूलकर यांनी १८ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शासनाने काढलेला आदेश त्वरित रद्द करून पूर्वीचा आदेश कायम ठेवला

बातम्या आणखी आहेत...