आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यात्रा:भारत जोडो यात्रा जळगाव जामोद मध्येच मुक्कामी

जळगाव जामोद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेगाव येथील जाहीर सभेनंतर जिल्ह्यात विविध ठिकाणी राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेला लोकांचा, महिला, मुली तसेच अबालवृद्धांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. आता ही यात्रा मध्य प्रदेश कडे रवाना होणार असताना या यात्रेचा जिल्ह्यातील मुक्काम वाढला आहे.

ही यात्रा आता २३ व २४ नोव्हेंबरला मध्यप्रदेशकडे कूच करणार असल्याची माहिती आहे. ही राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सिमेवर निमखेडी या गावातच राहणार असल्याची माहिती आहे. तर सोमवारी खा. राहुल गांधी हे गुजरात येथे होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी जाणार आहे, अशी माहिती पक्ष सूत्रांकडून मिळाली.

राहुल गांधी हे गुजरातमध्ये २३ व २४ तारखेपर्यंत राहू शकतात. यामुळे मध्य प्रदेशकडे होणारे प्रस्थान, त्यांच्या गुजरातमधून होणाऱ्या परतीवर अवलंबून आहे. यात्रा माघारी फिरणे नाहीच, असा राहुल यांचा निर्धार असल्याने, ही यात्रा जळगाव जामोद व मध्य प्रदेश सीमेवरील निमखेडी जिल्हा बुलडाणा येथे मुक्कामी राहणार आहे. यात्रेसोबतचे कंटेनर निमखेडी येथेच राहणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. गुजरात दौऱ्यासाठी निमखेडी येथेच हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. हेलिकॉप्टरने राहुल गांधी रवाना होणार आहेत.

सिने अभिनेतेही यात्रेसोबत
बुलडाणा जिल्ह्यात भारत जोडो यात्रा आली तेव्हा नगमा या हिंदी सिने अभिनेत्री यात्रेसोबत होत्या. तर ही यात्रा जळगाव जामोद येथे आली तेव्हा मराठी व हिंदी चित्रपट अभिनेते अमोल पालेकर सहभागी झाले. ते भेंडवळ ते जळगाव जामोद दरम्यान चालले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सहभागी झाल्या होत्या. या यात्रेत अनेक सिने अभिनेते अभिनेत्री जोडले गेले होते. तर समाजातील विविध घटकांमधील लोकांनी सहभाग घेऊन आपला पाठिंबा दर्शवला आहे. रिया सेनही या यात्रेत दिसून आल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...