आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:भरधाव टिप्परने दुचाकीस्वारास चिरडले; दोन जण ठार, एक जखमी

खामगाव15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील माटरगाव येथील सुसंस्कार शिबिरात शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या भावाला भेटण्यासाठी दुचाकीने गेलेल्या काका-पुतण्या भेट घेऊन माटरगाव येथून घराकडे जलंब येथे येत असताना माटरगाव वरुन भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्पर चालकाने त्यांच्या दुचाकीस मागून जबर धडक दिली.

या अपघातात काका-पुतण्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना जलंब माटरगाव रोडवर असलेल्या निंबी फाट्या जवळ बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. कुणाल देशमुख, शाम भीमराव देशमुख, पार्थ गंभिरराव देशमुख हे दुचाकीने माटरगाव येथे सुसंस्कार शिबिरामध्ये शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या भावाला भेटण्यासाठी गेले होते. भावाची भेट घेऊन काका-पुतण्यासह तिघेही माटरगाव येथून दुचाकीने घराकडे जलंब येथे परत येत होते. निंबी फाट्या जवळ येताच त्यांच्या दुचाकीला पाठी मागून येणाऱ्या एम.पी.०४ / एच ई/ ४५९२ या क्रमांकाच्या टिप्पर चालकाने जबर धडक दिली.

अपघातात दुचाकीवरील ३० वर्षीय शाम भीमराव देशमुख जागीच ठार झाला. तर पार्थ गंभिरराव देशमुख व कुणाल देशमुख हे दोघे जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी येथील सिल्व्हर सिटी हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. परंतु उपचार सुरु असताना दहा वर्षीय पार्थ देशमुख याचाही रात्री दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...