आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यक्षपद:अंढेरा तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी भास्कर वाघ

अंढेराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंढेरा येथील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी भास्कर वाघ यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडी संदर्भात स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात २९ ऑगस्ट रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.

या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच रुपाली रामदास आंबिलकर होत्या. नव्याने तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदी निवड होणार असल्याने ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने ग्रामपंचायत कार्यालयात हजेरी लावली होती. दरम्यान ग्रामविकास अधिकारी विष्णू गिते यांनी विविध विषयाचे ग्रामसभेसमोर सविस्तर वाचन केले. तंटामुक्ती समिती अध्यक्ष पदासाठी एकमेव भास्कर वाघ यांचा अर्ज असल्याने त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

त्यांची बिनविरोध निवड होताच ग्रामस्थांनी जल्लोष करत गुलालाची उधळण केली. यावेळी उपसरपंच पती गजानन सानप, जगन सानप, गजानन पालवे, किरण पालवे, रामकिसन हुसे, बबन वाघ, नितीन नागरे, गजानन कुटे, सुभाष गाडे, भारत तेजनकर,राजु वाघ, कैलास नागरे, दिपक तेजनकर, बालू सानप, बालू डोंगरदिवे, जिवन विनकर, पत्रकार राधेश्याम ढाकणे, कृषी सहायक डोईफोडे, राकेश इंगळे, ज्ञानेश्वर म्हस्के आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...