आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी:हिंदूंकडून किन्होळ्याच्या मशिदीला भोंगा भेट, विशेष बुलडाण्यातील केळवदच्या ग्रामस्थांचा सामाजिक सलोखा

बुलडाणा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातच नव्हे, तर देशात भोंग्यांवरून राजकारण तापलेले असतानाच पुरोगामी विचारांचे गाव असलेल्या केळवद येथील हिंदूंनी मुस्लिमांना ईदच्या पवित्र दिवशी भोंगा भेट देऊन हिंदू-मुस्लिम एकतेचे अनोखे दर्शन घडवले. गावात मशीद नाही, मात्र शेजारील किन्होळा येथील मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छांसह हिंदू बांधवांनी भोंगा भेट दिला. केळवद ग्रामपंचायतीत हा अनोखा कार्यक्रम पार पडत ग्रामस्थांनी धार्मिक द्वेषाला फाटा दिला.

केळवद पुरोगामी विचारांचे गाव म्हणून ओळखले जाते. क्रांतिसिंह नाना पाटील यांनी २१ दिवस याच भूमीमध्ये प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. इंग्रजांच्या विरोधातील चळवळ या गावातून पुढे चालली होती. राज ठाकरे भोंगे काढण्याचे सांगतात. हा प्रयत्न त्यांनी कुटुंबापासून सुरू करावा. बहुजन मुलांना ते दलदलीत अडकवण्याच्या प्रयत्नात आहेत, असे मत साहित्यिक गणेश निकम यांनी या वेळी व्यक्त केले. इतिहासाची चुकीची मांडणी ते करत आहेत. महात्मा फुले यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधली, ती नीटनेटकी केली. म्हणजे तत्पूर्वीच ती समाधी बांधली गेली होती. छत्रपती राजाराम महाराजांनी ती बांधली. असे असतानाही मध्येच टिळकांना त्यांनी आणले, असेही निकम म्हणाले. कार्यक्रमप्रसंगी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष उमेश पाटील, माजी उपसरपंच ज्ञानदेव कालेकर, नितीन हिवाळे, समाधान ताजने, नारायण वाणी, रमेश उन्हाळे, गोपाळ वाघमारे, संतोष भोलाने आदींची उपस्थिती होती.

तरुणांनी भोंग्यांच्या मागे न धावता शिक्षणात पुढे जावे
राज्यात भोंग्यांचे राजकारण सुरू आहे. हा देश सर्वधर्मीयांचा आहे. मुलांनी एमपीएसी, यूपीएससी करावे. तरुणांनी भोंग्यांच्या मागे धावू नये, असे सामाजिक कार्यकर्ते नंदू बोरबळे यांनी सांगितले.

मुस्लिम बांधवाना भाेंगा देताना उमेश पाटील, नंदू बोरबळे, गणेश निकम इतर.

बातम्या आणखी आहेत...