आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारोती मंदिर संस्थान:भरोसा, रामनगर येथे विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण सोहळा

चिखली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील रामनगर येथील मारोती मंदिर संस्थान येथे ७ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता तर भरोसा येथील महादेव मंदिर संस्थान येथे सायंकाळी पाच वाजता २ कोटी २५ लाख रुपयांच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून जिल्ह्याचे माजी पालक मंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे हे उपस्थित राहणार आहेत. तर अध्यक्ष म्हणून माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार रेखाताई खेडेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, विनायकराव पडघान, एकनाथ पाटील, ज्योती खेडेकर, गजानन वायाळ, उषा थुट्टे, शंतनु बोंद्रे, संगीता थुट्टे, शेनफडराव घुबे, उद्धव पाटील, शेखर बोंद्रे, मनोज खेडेकर, राजू जावळे, संजय गाडेकर, गजानन पवार, राम खेडेकर, प्रमोद पाटील, सुभाष देव्हडे, श्रीकृष्ण मिसाळ, संजय खेडेकर, समाधान परिहार, दीपक म्हस्के, भानुदास थुट्टे, ओमप्रकाश भुतेकर, सिद्धेश्वर परिहार, भानुदास घुबे, अरुण पवार, राजू भगत यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच व सदस्यांसह भरोसा जिल्हा परिषद सर्कल मधील कार्यकर्त्यांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भागवत थुट्टे व अंकुश थुट्टे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...