आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिपूजन:साडेआठ कोटींच्या कामाचे देऊळगावराजात भूमिपूजन; विकास कामातून होतोय कायापालट: डॉ. शिंगणे

देऊळगावराजा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळात आरोग्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला. मात्र,आता कोरोनाचा काळ संपला असून आरोग्य यंत्रणा देखील या निमित्ताने सक्षम बनली आहे. दरम्यान, शहरातील विविध भागातील नागरिकांच्या मागणी नुसार आवश्यक असलेले सिमेंट रस्ते, डांबरीकरण, खडीकरण, सामाजीक सभागृह, नाली बांधकाम व धार्मिक स्थळाचे असे एकूण साडेआठ कोटीचे विकासात्मक कामे पूर्णत्वास जात असून नव्याने जवळपास नऊ कोटी रूपयांचे कामे मंजुर आहे. त्यामुळे या विकास कामातून बालाजी नगरीचा कायापालट होत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले. देऊळगावराजा शहरासाठी शासनाच्या वित्त व नगर विकास विभागाच्या माध्यमातून राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी एकूण १६ कोटी १ लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यापैकी १० मे रोजी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी साडेआठ कोटी रूपयांचे विकास कामाचे लोकार्पण व भूमिपूजन केले. या कार्यक्रमाला अॅड. नाझेर काझी यांची प्रमुख उपस्थिती होती.

दरम्यान ७० लक्ष रूपयांचे आमना नदी ते मारोती मंदिर रस्ता डांबरीकरण, जाफ्राबाद सिमेंट रस्ता बांधकाम ३० लक्ष रू., यासह आमदार निधी अंतर्गत विविध कामाचे लोकार्पण करण्यात आले. यासह शहरातील विविध भागातील साडेसहा कोटी रूपयांचे सोळा विकास कामाचे भूमिपूजन पार पडले. यावेळी माजी नगराध्यक्ष कविश जिंतुरकर, संतोष खांडेभराड, ज्येष्ठ नेते गणेश सवडे, तालुकाध्यक्ष उद्धव म्हस्के, शहराध्यक्ष अॅड. अर्पित मिनासे, संतोष बुरकुल, माजी नगरसेविका सुनीता सवडे, गजानन पवार, सय्यद करीम, बाळू खांडेभराड, प्रदीप वाघ, अरविंद खांडेभराड, दत्ता काळे, बाबासाहेब कासारे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...