आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

बुलडाणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव जाणाऱ्या कारचे अचानक टायर फुटल्याने कार अनियंत्रित झाली व समोरून येणाऱ्या दुचाकीला जाऊन धडकली. या अपघातात दुचाकीस्वार वडील ठार झाले, तर मुलगा जखमी झाला आहे. ही घटना शनिवार, ३ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास बुलढाणा-मलकापूर मार्गावरील राजूर घाटात घडली.

प्राप्त माहितीनुसार, मोताळा तालुक्यातील मूर्ती येथील अशोक सखाराम मक (५५) हे बुलडाण्यात डायलिसिस करण्यासाठी मुलगा सचिन मक (२५) याच्यासोबत दुचाकीने बुलढाणाकडे येत होते. राजूर घाटातून येत असताना समोरून येणाऱ्या कारचे अचानक टायर फुटले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती कार दुचाकीला जाऊन धडकली.

या अपघातात वडील अशोक मक यांचा मृत्यू झाला. तर मुलगा सचिन जखमी झाला आहे. अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला येथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...