आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउन्हाळ्याची चाहूल लागताच पक्षी प्रेमी आपल्या अंगणात पक्षांसाठी पाणवठे तयार करून ठेवतात. त्यासोबतच जर आपण प्रत्येकानी आपल्या अंगणात पक्षांसाठी मुठभर धान्य व घोटभर पाण्याची सोय केली तर रखरखत्या उन्हाळ्यातही छोट्या पाखरांचे पिण्याच्या पाण्याची सोय होईल व पाण्याच्या शोधात पक्ष्यांचा जीव गेल्याची बातमी कानी पडणार नाही. या गोष्टीचे महत्त्व जाणून ६ मार्च रोजी गुरूदतनगर येथील संजय गुरव यांनी लहान मुलांना घेऊन चिमणी पक्षांसाठी टाकाऊ वस्तूपासून आकर्षक बर्डफिडर निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
घरी असलेल्या टाकाऊ वस्तूंचा आपण कसा उपयोग घेऊन टिकाऊ व आकर्षक बहूउपयोगी वस्तू निर्मिती करू शकतो, याचे प्रात्यक्षिक कार्यशाळेत देण्यात आले. या आकर्षक बर्ड फिडरसाठी टाकाऊ रिकाम्या बाटल्या, तार, सुतीदोरा, इलेक्ट्रिक फिटींग पाईप, टी, फ्लेक्स बॉण्ड सोल्युशन इत्यादी वस्तू वापरण्यात आल्या. या बर्ड फिडरवर बसून पक्षी दाने टिपतात. ज्यामुळे एकही धान्याचा दाना वाया जात नसून पक्षांचे शिकारी पशू, पक्षापासून संरक्षण होते.
या कार्यशाळेकरता परिसरातील गौरव इंगळे, तेजस भुंबरे, खुश गोयल, दिशा गोयल,मनवा जोशी, सई शिंदे, जान्हवी भागवत, अनु भागवत, श्रृती सरुडकर आदींची उपस्थिती होती. कार्यशाळा आयोजनासाठी किशोर भागवत, गौरव इंगळे यांचे सहकार्य लाभले.
मूठभर धान्य, पाण्याची सोय करा
आपल्या परिसरातील पक्षी वैभव अबाधित राहण्यासाठी व आपल्या अंगणात पक्षांची किलबिल कायम असावी. याकरिता प्रत्येकानी आपल्या अंगणात पाखरांचे करीता मुठभर धान्य व घोटभर पाण्याची सोय केली पाहिजे. ज्यामुळे पक्षांना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी व अन्नाच्या शोधात भटकावे लागणार नाही. संजय माधव गुरव, पक्षीमित्र, खामगाव.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.