आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र पक्षी सप्ताह निमित्त येथील सामाजिक संस्थांचे माध्यमातून आज ८ नोव्हेंबर रोजी पक्षीमित्रांकरीता पक्षी मित्र निरिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. खामगाव शहरात लगतच असलेल्या जनुना तलाव परिसरात वरील कार्यक्रमाचे आयोजन चिऊताई घरकुल योजना, मुक्तांगण परिवार व तरुणाई फाउंडेशनचे वतीने करण्यात आले असून याकरता वय वर्ष तेरा ते साठ वयाचे पक्षी प्रेमी सहभागी झाले होते. यावेळी जवळपास पन्नास पेक्षाही जास्त पक्ष्यांचे निरीक्षण करून त्याच्या नोंदी घेण्यात आल्या.
यावेळी पक्षांचा अधिवास, घरटे प्रकार, खाद्य संस्कृती, आकार, आवाज व रंग यावरून त्यांची ओळख कशी पटवायची याकरिता पक्षी मित्र संजय गुरव व विजय खंडागळे यांनी मार्गदर्शन केले. पक्षी ओळखण्याकरीता ई बर्डस् बुकचा उपयोग घेण्यात आला. ज्या मधून नूतन पक्षी मित्रांना व विद्यार्थ्यांना मदत झाली. झुडपात राहणारे, मोठ्या उंच वृक्षावर राहणारे तथा पाण्याच्या ठिकाणी राहणारे पक्षी असे वर्गीकरण करून टप्प्या टप्प्यात पक्षी निरीक्षण करण्यात आले. यावेळी पक्षी छायाचित्रण कसे करावे याबद्दल छायाचित्रकार कैलास कुटे यांनी मार्गदर्शन केले.पक्षीमित्र राजेश कोल्हे यांनी जखमी पक्ष्यांची सुश्रुषा यावर प्रकाश टाकला तर अनाथ पक्षी पिल्लांना कसे सांभाळावे याबद्दल कलाध्यापक संजय गुरव व विजय खंडागळे यांनी माहीती दिली.पक्षी निरीक्षण व नोंदी घेण्यासाठी अमोल तायडे, स्वरा सातपुते,गणेश कोकाटे, आंचल खंडागळे यांनी सहकार्य केले.
या पक्ष्यांचे करण्यात आले निरीक्षण
यामध्ये पिंगळा घुबड, गव्हाची घुबड, करकोच्या, सर्पमान्या, ससाणा, घार, शिकरा, बदक ,गायबगळा, सुतार पक्षी, शिंपी, सिंजिर, दयाळ, कावळा, रानचिमणी, होला (पट्टेदार),होला(ठिपकेदार), सर्पगरूड,धोबी (परीट),चिरक, सिल्व्हर मुनिया, टिटवी, पांढऱ्या मानेचा करकोचा, बुलबुल, कबुतर, राखाडी धनेश, तांबट, पोपट ,वेडा राघू, खंड्या (धीवर), नीलकंठ, कोकीळ, भारद्वाज, शेताच्या, तारवाली, पाणकोंबडी, कवड्या धीवर, खाटीक, कोतवाल, सुगरण, पाकोळी, सातभाई, वटवट्या, कॉमन पोंड हेरॉन, पाणकावळा, पाणकोंबडी, मोर या पक्ष्यांची जनुना तलाव परिसरात निरीक्षणातून नोंद करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.