आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:ओबीसींचे राजकीय नुकसान करण्याचे काम भाजपने केले, नाना पटोले यांचा आरोप

बुलडाणा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चिखलीत रात्री दीड वाजता कोरोना आढावा बैठक

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा दुरुपयोग करून नागपूर जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्याच, पण भंडारा, गोंदिया, पालघर, नंदुरबार व वाशीम या चार जिल्हा परिषदांच्या निवडणुका होऊ दिल्या नाहीत. या जिल्हा परिषदा उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वोच्च न्यायालयात गेल्या. कोर्टाने निवडणुका थांबविल्या नाहीत तर सदस्य अपात्रतेचा निर्णय मार्चमध्ये दिला. कोर्टाने असे म्हटले की, ओबीसी जनगणनेचा आकडा केंद्र सरकारने आम्हाला दिलेला नाही. ओबीसीच्या संख्येचे रेकॉर्ड नाही. जे काही ओबीसी रेकॉर्ड दाखवण्यात आले ते चुकीचे आहे. त्यामुळे ओबीसी सदस्यांना अपात्र करण्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. त्यामुळे केंद्रात तुमचे सरकार आहे, त्या वेळी कोर्टाने सांगून दोन वर्षे होऊनही आयोग बसवला नाही. याप्रकारे ओबीसी समाजाचे नुकसान करण्याचे काम भाजपने ठरवून केले आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी केला.

कोरोनाबाबत पटोले यांनी केंद्र शासनाला दोष देत पंतप्रधानांनीच ऑक्टोबरमध्ये दुसरी लाट येत असतानाही लोकांना अंधारात ठेवले व मार्चच्या पहिल्या आठवड्यात भारत कोरोनामुक्त झाल्याचे सांगितले. कारण पाच राज्यांच्या निवडणुका होत्या. त्यानंतर कोरोनाने हातपाय पसरले, अशी टीकाही त्यांनी केली.

चिखलीत रात्री दीड वाजता बैठक
कोविडचा आढावा घेत बुलडाणा जिल्ह्यात दाखल झालेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मेहकर येथील भेटीनंतर चिखली येथे आढावा घेतला. दिवसभराच्या नियोजित दौऱ्याला खूप उशीर झाल्याने त्यांनी रात्री १.३० वाजता काँग्रेस नेत्यांची बैठक घेत मार्गदर्शन केले. एवढ्या उत्तररात्री पक्षाची सभा झाल्याने आज दिवसभर चर्चा राहिली.

बातम्या आणखी आहेत...