आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:जागा वाटपात घाटा होण्याच्या शक्यतेमुळे भाजप विचारात

बुलडाणा / लक्ष्मीकांत बगाडे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या शिंदे सेना ही राष्ट्रवादीवर तुटून पडली आहे. तर शिवसेनेतच सध्या दोन मतप्रवाह आहेत काही शिंदे गटासोबत तर काही उद्धव ठाकरे यांच्यासोबत निष्ठा जोपासून आहेत. अशातच जिल्हा परिषद व नगर पालिकांच्या निवडणुकीचा बिगुल केव्हाही वाजू शकतो. निवडणूक आयोगाने आम्ही तयार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे आरक्षण सोडतीचा मुहूर्तही २८ जुलै रोजी ठरला आहे. त्यामुळे आता निवडणुकांचा पाऊस ऐन पावसाळ्यात पडण्याच्या शक्यतेने विविध पक्षीय गटात आपापसात लढाया सुरू असताना भाजप मात्र आपल्या वाट्यातील जागांचा वाटा शिंदे गटासोबत युती केल्यास घाटा तर होणार नाही ना, या विचारात आहे. कारण जि. प. सोबतच नगराध्यक्षपद मिळवण्यासाठी भाजप उत्सुक आहे.

बुलडाणा जिल्हा परिषदेच्या जागांमध्ये यावेळी आठने वाढ झाल्यामुळे सदस्य संख्या ही ६८ इतकी झाली आहे. ओबीसी आरक्षण २७ टक्के मिळाल्यास १८ किंवा १९ जागा जिल्हा परिषदेच्या राहणार आहे. इतर जागा सर्व साधारण, अनुसूचित जाती, जमाती, व्हीजेएनटी आदि प्रवर्गासाठी सुटणार आहे. पंचायत समित्यांच्याही जागा १२० हुन १३६ इतक्या झाल्याने त्यातही ओबीसी २७ टक्के झाल्यास ३६ हुन अधिक जागा मिळु शकतात. अशा या जागांचे आरक्षण तर २८ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय येथे काढण्यात येणार आहे. आरक्षणानंतर इच्छुकांची संख्याही वाढणार आहे. त्यानुसार युती, आघाडी होते की काय, याबाबत संभ्रम आहे. परंतु, भाजप सोबत युती करण्यास आतापासूनच शिवसेना आपलीच समजणाऱ्या शिंदे गट उत्सुक असल्याची चर्चा आहे. ही युती भाजपपेक्षा शिंदे गटाला सोयीची होणार असून भाजपला आपल्यातला वाटा देण्याचे काम पडणार असल्यामुळे भाजपमधील इच्छुक नाराजीच्या उंबरठ्यावर राहणार आहे. आजतरी फक्त ही चर्चा आहे. दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना यांची महाविकास आघाडी होण्याचे अजूनतरी स्पष्ट संकेत नाही. परंतु, या आघाडीला जागा वाटपात फारशी अडचण येण्याची शक्यता काही ठिकाणीच होणार असल्याने आतापासून निवडणुकीतील आपला वाटा जाऊ न देण्याची कसरत मात्र सुरु आहे.

असे आहे प्रत्येक पक्षाचे बलाबल
एकुण ६० जागा जिल्हा परिषदेच्या होत्या. त्यानुसार सेना १०, भाजप २४, राष्ट्रवादी ८, काँग्रेस १३, भारिप २, अपक्ष २ अशा जागा आहेत. भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे तर सेना तिसऱ्या स्थानी आहे. आता शिंदे गटामुळे शिवसेनेत फुट आहे. मेहकर भागात शिवसेनेचे सर्वाधिक ४ जि. प. सदस्य आहेत. तर बुलडाणा नांदुरा, चिखली व देऊळगाव राजा येथे प्रत्येकी एक व लोणार मध्ये दोन सदस्य आहेत. त्यामुळे फक्त घाटावरच शिवसेना व सध्याच्या शिंदे गटाजवळ जागा आहे. भाजप मात्र लोणार, देऊळगाव राजा, बुलडाणा वगळता सर्वत्र जि. प. सदस्य असलेला पक्ष आहे. त्यामुळे भाजपला यावेळी या राहिलेल्या ठिकाणी संधी मिळाली तर आपले वर्चस्व प्रस्थापित करता येऊ शकते. त्यामुळे वाटयातुन वाटा देऊन घाटा पत्करण्याची तयारी भाजपचे नेते करतील, हा चर्चेचा विषय ठरत आहे.

नगर पालिका अध्यक्षपदाचेही असेच
जिल्हयात नगर पालिकेच्या सध्या ३०१ जागा आहे. यामध्येही किरकोळ वाढ होणार आहे. या तेराही नगर पालिकांमध्ये काँग्रेस हा १०३ जागा असणारा मोठा पक्ष आहे. भाजप ७५ जागा जिंकणारा दुसरा पक्ष आहे. तिसरा पक्ष शिवसेना आहे ज्याच्या ५१ जागा आहे. त्यातच अध्यक्षपदही जास्त भाजपकडेच आहे. यावेळी शिंदे गटाविरुध्द शिवसेना गटही निवडणुकीत शड्डू ठोकून उभा राहणार आहे. कारण ज्यांना मागील वेळी तिकीट नाकारण्यात आले असे शिवसेनेतच राहुन ऊभे राहु शकता. मात्र भाजपची मागील वेळीही युती नव्हती व यावेळी शिंदे गटासोबत युती करुन आपल्या पक्षाच्या इच्छुकाला डावलून दुसऱ्याला वाटा दिल्यास पक्षांतर्गत नाराजी पसरु शकते. त्यातच जर यावेळी नगराध्यक्षपदाची संख्या वाढवण्याची संधीही हातू जाऊ शकते. त्यामुळे वाटयात घाटा नको, अशी भुमिका भाजप नेते घेतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.

बातम्या आणखी आहेत...