आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुकास्पद निर्णय:पुढील सर्व निवडणुका भाजप शिवसेना शिंदे गटासोबत लढणार; आ.डॉ. कुटे यांची माहिती, आम्ही ओरिजनल शिवसैनिक खा. जाधव

शेगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सत्तातर झाल्या नंतर जिल्ह्यातील भाजप-शिवसेना शिंदे गट यांची पहिली जिल्हास्तरीय बैठक झाली असून यापुढील सर्व निवडणुका आम्ही सोबत एकत्रित लढू , अशी माहिती आ.डॉ. संजय कुटे यांनी दिली. विश्रामगृह येथे शिवसेना शिंदे गट व भाजप बैठकी नंतर आज आयोजित पत्रकार परिषदेत केले.आ. कुटे म्हणाले की, शिवसेना व भाजप युतीला २०१९ साली जनादेश असताना अनैसर्गिक आघाडी स्थापन झाली होती.

सत्तातरानंतर आलेले सरकार जनतेच्या मनातील सरकार असून एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस यांनी ओरिजनल युतीचे सरकार आणले आहे. केंद्र आणि राज्य मिळून सर्वसामान्य जनतेचा अपेक्षित विकास केला जाईल. जिल्ह्यातील सर्व प्रलंबित प्रश्न मिळून सोडवले जातील. केंद्राप्रमाणे राज्याने शेतकऱ्यांना तीन टप्प्यात अनुदान देण्याचे कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाचे अभिनंदन. शेतकऱ्यांना,अपादग्रस्तांना निकषाच्या तिप्पट १५ हजार तत्काळ मिळणारी मदत जाहीर केल्याने हे खरे शेतकऱ्यांचे सरकार असल्याचा दावा त्यांनी केला.

२०१९ ची निवडणूक आम्ही युतीत लढलो या युतीलाच जनतेने जनादेश दिला होता. मात्र बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन महाविकास आघाडी निर्माण करण्यात आली. जनतेने युतीला मतदान केले होते. त्या युती सोबत असल्याने आम्ही खरे शिवसैनिक आणि आमची खरी बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी शिवसेना असून काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत गेले ते गद्दार आहेत. त्यांनी आम्हाला गद्दार म्हणू नये. मुख्यमंत्री शिंदे , उपमुख्यमंत्री फडणवीस वीस तास काम करतात. त्यांचे माध्यमातून जिल्हयातील अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत.

त्यामुळे यापुढील सर्व निवडणुका आम्ही एकत्रित लढू असे खा. प्रतापराव जाधव यांनी सांगितले. या बैठकीस आ. पुंडकर,आ. रायमूलकर,आ. संजय गायकवाड,आ. महाले, माजी आमदार शशिकांत खेडेकर, माजी आमदार संचेती, माजी आमदार विजयराज शिंदे, माजी आमदार तोताराम कायंदे, योगेंद्र गोडे, जिल्हाप्रमुख शांताराम दाणे, संतोष लिप्ते, उमेश पाटील, रामेश्वर थारकर, संतोष देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील भाजपा-शिवसेना शिंदे गटाचे नेते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...