आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगजेब ही देशाची संतान असू शकत नाही, असा घणाघात भाजप प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केला. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्यावर एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी उपोषण सुरू केले. या उपोषणावर कुळकर्णी यांनी टीका केली.
शिवराय कुळकर्णी म्हणाले की, या देशात आणि महाराष्ट्रामध्ये औरंगजेब की छत्रपती संभाजी महाराज असा विषय येईल. तेव्हा या देशातील मातीचा कणकण छत्रपती संभाजी महाराज यांचेच नाव घेईल. औरंगजेबाने इथल्या मातीवर माताबघिणींवर अत्याचार केले. तलवारीच्या धाकावर धर्मांतरण केले. जुलमी राजवट चालवली. मंदिर फोडले. परकीय आक्रमक करणारा औरंगजेब या देशाची संतान असू शकत नाही, असा घणाघात त्यांनी केला. या देशाचे खरे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज आहेत. असे ते म्हणाले.
जलील होण्याआधीच एमआयएमने मागे घ्यावे
एमआयएम आणि इम्तियाज जलील यांनी अधिक 'जलील' होण्याआधी आपले उपोषण मागे घ्यावे, आणि छत्रपती संभाजी महाराज की जय असे म्हणत शहराच्या नामांतराला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
हे ही वाचा
नामांतराविरोधात इम्तियाज जलील यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू:आंदोलनात औरंगजेबाचे होर्डिंग्ज घेऊन पोहचलेल्या तरुणाला पिटाळले
औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर झाले आहे. केंद्र सरकारकडून या निर्णयाला अधिकृत परवानगी दिल्यानंतर या निर्णयाविरोधात खासदार इम्तियाज जलील यांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले. दरम्यान, या आंदोलन स्थळी एक तरुण औरंगजेबाचा फोटो घेऊन आला. मात्र, त्याला आयोजकांनी तात्काळ पिटाळून लावले. - येथे वाचा संपूर्ण बातमी
संभाजीनगर की औरंगाबाद:लोकांना काय वाटतं? नामांतर झाल्यानं खरंच त्यांचं आयुष्य बदलेल का? सर्वसामान्यांचंही ऐकून घ्या
राजकारणात अनेक गट-तट पडलेत. वेगवेगळ्या पक्षाचे, संघटनेचे वेगवेगळे विचार आहेत. मात्र, सर्वसामान्य माणसाच्या समस्या वेगळ्या आहेत. ज्याला रोजच्या भाकरीचा प्रश्न भेडसावतोय त्यांचे याबाबत नेमके काय विचार आहेत. त्याबाबत दिव्य मराठीचा हा ग्राऊंड रिपोर्ट. - येथे वाचा संपूर्ण बातमी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.