आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा दौरा:भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज जिल्ह्यात ; भाजप पदाधिकारी उपस्थ‍ित राहणार

खामगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपा प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आमदार चंद्रशेखर बावनकुळे बुलडाणा जिल्ह्यात प्रथम येत असून आगमन प्रसंगी ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात येणार आहे,अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी दिली.विदर्भाला प्रदेशाध्यक्ष पद देऊन महत्त्वाची जबाबदारी भारतीय जनता पार्टीने दिली आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर ते येणार असून अकोला येथून बुलडाणा येथे भाजपा पदाधिकाऱ्यांसोबत च्या बैठकीस मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी भारतीय जनता पार्टीचे सर्व सन्माननीय आमदार व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सदर बैठकीनंतर बुलडाणा येथून खामगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन शहरातून वाडी ता.खामगाव येथे सामाजिक भेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास उपस्थ‍ती राहणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे सर्व भाजप पदाधिकारी, युवा मोर्चा, विद्यार्थी आघाडी, सर्व आघाडी पदाधिकारी अध्यक्ष, कार्यकर्ते यांनी सायंकाळी ठिक ६ वा आपल्या मोटरसायकलसह उपस्थ‍ित रहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी खामगाव विधानसभा मतदार संघ तर्फे करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...