आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारभार:केंद्र सरकारच्या विरुद्ध काँग्रेसचा रास्ता रोको; भाजप सरकार अहंकारी असून आपला मनमानी कारभार

संग्रामपूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रातील भाजप सरकार अहंकारी असून आपला मनमानी कारभार करीत आहे. विरोधकांचे खच्चीकरण करण्यासाठी भाजप सरकार केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरुन काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर कारवाई करत आहे. या कारवाईच्या निषेधार्थ आज १७ जून रोजी तालुका व शहर कॉग्रेसच्या वतीने संग्रामपूर ते जळगाव जामोद रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प पडली होती. दरम्यान, आंदोलनस्थळी पोलिसांनी धाव घेवुन आंदोलनकर्त्यांना स्थानबद्ध करून नंतर त्यांची सुटका केली.खासदार राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलावून त्यांना सतत त्रास देणे, दिल्ली येथील काँग्रेस कार्यालयाला पोलीसांकडून घेराव घालणे, वरिष्ठ नेत्यांना पोलिसांमार्फत मारहाण करणे, त्यांना डांबून ठेवणे हा केंद्रातील मोदी सरकारच्या दडपशाहीचाच एक भाग आहे.

केंद्रातील मोदी सरकारच्या या दडपशाही विरोधात आज १७ जून रोजी शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने संग्रामपूर-जळगाव जामोद रोडवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. दीड तासाच्या आंदोलना नंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात स्थानबद्ध करून नंतर त्यांना सोडून देण्यात आले. या आंदोलनात तालुका व शहरातील कॉंग्रेस पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...