आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रास्ता रोको:केंद्राच्या दडपशाही विरोधात खामगावात आज काँग्रेसचे रास्ता रोको

खामगाव9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सक्त वसुली संचालनालयाकडून नोटीस देत सातत्याने चौकशीसाठी बोलावून त्रास दिला जात आहे. सतत चौकशीसाठी बोलावणे, दिल्ली येथील अखिल भारतीय काँग्रेस कमिटी कार्यालयाला पोलिसांकडून घेराव घालणे, वरिष्ठ नेत्यांना पोलिसांमार्फत मारहाण करणे, त्यांना डांबून ठेवणे हा केंद्रातील मोदी सरकारच्या प्रचंड दडपशाहीचा प्रकार आहे. त्याचा निषेध करण्यासाठी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात आज २० जून सोमवार रोजी सकाळी ११ वाजता नांदुरा रोडवरील जयस्तंभ चौकात रास्ता रोको व जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे.

जिल्हा काँग्रेस अध्यक्षा राहुल बोंद्रे यांच्या सूचनेनुसार आंदोलन होणार आहे. त्यासाठी हे रास्ता रोको व जेल भरो आंदोलन केले जात आहे. आंदोलनात पदाधिकारी, नगरसेवक, जि. प., प. स. सदस्य, बाजार समिती संचालक आदींनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका अध्यक्ष डॉ. सदानंद धनोकार, शहर काँग्रेस प्रभारी सरस्वती खासणे, शेगाव तालुका अध्यक्ष विजय काटोले यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...