आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:शहराचे नाव राज्यस्तरावर नेण्यासाठी बीएलओंनी कामाला त्वरीत गती द्यावी

देऊळगावराजा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मतदान ओळख पत्र आधार कार्ड सोबत लिंकसाठी शहरातील सर्वच बीएलओ काम करीत आहेत. दरम्यान, उपजिल्हाधिकारी निवडणूक गौरी सावंत यांनी शहरातील मतदान केंद्रांना भेटी देऊन कामकाजाची माहिती घेतली. तसेच या कामास गती देऊन देऊळगावराजा शहराचे नाव राज्यस्तरावर नेण्यासाठी सर्वच बीएलओंनी काम वेळेच्या आत पूर्ण करावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी निवडणूक गौरी सावंत यांनी केले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने संपुर्ण देशात मतदार ओळखपत्र हे आधार कार्डला जोडण्याचे काम बीएलओंना दिले आहे. सोबतच त्या मतदारांकडून सहा ब हा फॉर्म भरून घेण्यात येत आहे. देऊळगावराजा तालुक्यातील कामकाज हे १० % च्या वर झाले असून सदर काम शंभर टक्क पूर्ण करण्याचे निर्देश आहे. त्याअनुषंगाने राज्याचे नाव अव्वल आणण्यासाठी संबंधित यंत्रणा प्रमुख कामाला लागले असून जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी गौरी सावंत या प्रत्येक तालुक्यात जाऊन मतदान केंद्राला भेट देऊन कामकाजाची पाहणी करीत आहेत. तसेच बीएलओ व तालुकास्तरीय निवडणूक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना सूचना देऊन कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना देत आहे.गौरी सावंत यांनी सनगर परिषद मराठी प्राथमिक शाळा क्रमांक १ मधील मतदान केंद्राला भेट देऊन आधार लिंकच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी नायब तहसीलदार प्रीती जाधव, प्रशांत वाघ, अमोल जाधव, बीएलओ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...