आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:बोलेरो पिकअप व कारची समोरासमोर धडक; दोनजण गंभीर

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव बोलेरो पिकअप व स्विफ्ट डिझायरची समोरासमोर धडक झाल्याने दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. चिखली तालुक्यातील मलगी फाट्यावर ५ नोव्हेंबर रोजीच्या सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेले दोघेही देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगावमही येथील रहिवासी आहेत. स्विफ्ट डिझायर कार देऊळगाव महीकडून चिखलीकडे येत होती.तर बोलेरो पिकअप चिखली कडून डोलखेड ता.जाफ्राबाद कडे जात होते.

मलगी फाट्यावर येताच दोन्ही वाहनाची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कार मधील वसीम नसीम सय्यद वय ३० व आशिष खिल्लारे वय ३० दोघेही रा.देऊळगाव मही हे गंभीर जखमी झाले. त्यांना चिखली येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. अपघातानंतर बोलेरो चालक वाहन उभे करून घटनास्थळा वरून पसार झाला. या अपघाताची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या अपघात प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...