आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रा. अश्विनी जाधव यांचे प्रतिपादन:शिक्षण अन् शिक्षक या दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या

देऊळगावराजा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक आणि शिष्य यांच्यात शिक्षण आणि ज्ञानाचे नाते असते. शिक्षण आणि शिक्षक या दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या असतात, कारण आपल्या जीवनाला घडवण्यात आपल्या पालकांनंतर त्यांची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. जसे आपले आई-वडील हे आपले देव आहेत, त्याचप्रमाणे देव आपल्या गुरू मध्ये वास करतात. “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरूर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः” म्हणत गुरूची महती सांगण्यात येते. म्हणूनच शिक्षकाशिवाय आपल्याला शिक्षण आणि ज्ञान मिळू शकत नाही असे प्रतिपादन प्रा. अश्विनी जाधव यांनी केले.

येथील समर्थ कृषी महाविद्यालयात ५ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त अभिवादन करून शिक्षक दिन साजरा करण्यात आला. चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. नारायण बोडके होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. अश्विनी जाधव, प्रा. देवानंद नागरे, सुवर्णा उमाले हे उपस्थित होते. दरम्यान सर्व शिक्षक व कर्मचारीवृंदाचे विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन स्वागत केले. प्रमुख अतिथी प्रा. अश्विनी जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शिक्षणाचे धडे व जगण्याची कला कशी आत्मसात करावी यावर मार्गदर्शन केले. त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, असे म्हणतात की, काळापेक्षा चांगला शिक्षक कोणीही नाही. कारण खूप उशीर झालेला असतो पण वेळ आपल्याला सर्व काही शिकवून जाते.

पण माझा असा विश्वास आहे की आपण शिकण्यास उशीर का करावा, आपण आपल्या गुरू किंवा शिक्षकांकडून ते शिक्षण किंवा ज्ञान एक शिष्य म्हणून अगोदर का घेऊ नये. जेणेकरून नंतरचे त्रास टाळता येतील. कारण कठीण प्रसंगांना कसे सामोरे जायचे हे शिक्षकच शिकवतात असेही प्रा. अश्विनी जाधव यांनी सांगितले. तसेच प्रा.सोनाली इंगळे व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. नारायण बोडके यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्याचबरोबर पूजा मोरे, हेमलता कुंबरे, दीपाली मोरे, श्रुती बाबर,गौरव देशमुख व धनेश टाकवले या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिम्पल वाहाने हिने तर आभार प्रदर्शन तन्वी पाटील या विद्यार्थिनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ऋषिकेश मातळे, दीपक राठोड, प्रणव कथलकर, पार्थ वायचोळ, प्रदीप खांडवे, कैलास वाघ, निशिता पातुर्डे, अर्पिता साबळे, सोनाली जोहरे या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...