आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशी पिस्तुलासह काडतूस घेऊन दुचाकीने गणवाडी गावाकडे जाणाऱ्या दोन भावांपैकी एका भावास पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी त्याच्या ताब्यातून एक देशी पिस्तुल, तीन जिवंत व दोन वापरलेले काडतूस असा एकुण ४८ हजार ६०० रूपयांचा माल जप्त केला आहे. ही कारवाई शहर पोलिसांनी ५ फेब्रुवारी रोजी रात्रीचे सुमारास केली आहे. या प्रकरणातील दुसरा भाऊ पळून जाण्यात यशस्वी झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस सूत्रानुसार मिळालेल्या माहितीनुसार, दोनजण लाल रंगांच्या स्कुटीवरुन देशी पिस्तूल घेवून गणवाडी गावाकडे जात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली.
या माहितीवरून पोलिसांनी गणवाडी रोडवरील गुरूद्वाराजवळ सापळा रचला. काही वेळानंतर एका लाल रंगाच्या स्कूटीवर दोन जण मलकापूर कडून गणवाडी गांवाकडे जाताना पोलिसांना दिसून आले. यावेळी पोलिसांनी त्यांना थांबवले असता पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार शेख साबीर शेख अहेमद वय २८ रा.सायकलपुरा मलकापूर यास ताब्यात घेतले. तर दुचाकी मागे बसलेला एक जण पळून जाण्यात यशस्वी ठरला. याबाबत पोलिसांनी शेख साबीरला विचारणा केली असता त्याने तो माझा भाऊ शेख तालिब शेख अहमद वय २५ रा. सायकलपुरा मलकापूर असल्याचे सांगितले. पोलिसांनी एम.एच ०३/ ए यु / ७३७२ या क्रमांकाच्या वाहनाची झडती घेतली असता तिच्या डिकीत एक काळ्या रंगांची देशी पिस्तूल मिळून आली.
तसेच आठ हजार सहाशे रुपये किंमतीचे तीन जिवंत व दोन वापरलेले काडतूस, चाळीस हजार रुपये किंमतीची दुचाकी असा एकूण ४८ हजार ६०० रूपयांचा माल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी गोपाल तारूळकर यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपी शेख साबीर शेख अहेमद वय २८ रा. सायकलपुरा मलकापूर व शेख तालिब शेख अहेमद वय २५ या दोन भावांविरुद्ध आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई ठाणेदार अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक ईश्वर सोळंके, पोलिस कर्मचारी शेख आसिफ, प्रमोद राठोड, संतोष कुमावत, ईश्वर वाघ व सलीम बरडे यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.