आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावात शोककळा:गणेश विसर्जन करताना नदीत बुडून मुलाचा मृत्यू ; सिनगाव जहागीर येथील घटना

देऊळगाव राजाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वत्र गणेश उत्सवाचे वातावरण व सर्वांमध्ये उत्साह शिगेला पोहोचला असताना, गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेला सतरा वर्षीय मुलगा पाय घसरून नदी पात्रात पडला. यावेळी त्याच्या सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामध्ये त्यांना यश आले नाही. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. ही घटना सिनगाव येथे ९ सप्टेबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

तालुक्यातील सिनगाव जहांगीर येथील बळीराम विनायक बोबडे वय १७ हा घरगुती गणेश विसर्जन करण्यासाठी नदीवर गेला होता. यावेळी त्याच्या सोबत गावातीलच अजय ज्ञानेश्वर डोईफोडे, शंकर डोईफोडे हे होते. नदीकाठावर गणेश विसर्जन करीत असताना अचानक बळीराम बोबडे याचा पाय घसरल्याने तो नदीपात्रात पडला. यावेळी सोबत असलेल्या मित्रांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु बळीरामसह तिघेही नदी पात्रात पडले. ही घटना लक्षात येताच नदी काठावर उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून अजय व शंकरला बाहेर काढले.

परंतु बळीराम हा खोल पाण्यात बुडाल्यामुळे त्याचा पत्ता लागला नाही. या घटनेची माहिती मिळताच गावातील अंबादास नागरे, विष्णू नागरे, कल्याण डोईफोडे, प्रभू मांटे यांनी नदीकडे धाव घेत बळीरामला शोधण्यासाठी नदी पात्रात गळ टाकला. तब्बल आठ तासानंतर त्याचा मृतदेह पाण्या बाहेर काढण्यात त्यांना यश आले. मृत मुलगा हा सिनगाव येथील मूळ रहिवासी असून त्यांचे वडील विनायक शंकर बोबडे हे लालदेव फाटा मराठवाड्यात राहतात. गणेश विसर्जनाच्या दिवशीच ही घटना घडल्यामुळे गावात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास येथील पोलिस करीत आहेत. या घटनेमुळे गावात शोक पसरला आहे.

बातम्या आणखी आहेत...