आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुखाग्नी:रूढी, परंपरेला फाटा देत मुलीने दिला वडिलांच्या चितेला मुखाग्नी ; समाजासमोर एक आदर्श

मलकापूर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनिष्ठ रूढी, परंपरेला फाटा देत वडिलांच्या चितेला एकुलत्या एक मुलीने मुखाग्नी देत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. शहरातील सालीपुरा भागातील रहिवाशी विनायक प्रकाश आसलकर वय ३८ यांचे ९ जून रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना एकमेव मुलगी असल्याने अंत्यसंस्काराचे सोपस्कार कसे पार पाडावे, असा प्रश्न उभा ठाकला होता. या वेळी घरातील व समाजातील मंडळींनी मुलीला अग्निसंस्कार करण्यास पुढे केले. त्यावेळी विनायक आसलकर यांची मुलगी ममताने वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी निघालेल्या प्रेतयात्रेत टिटव पकडण्यासह वडिलांच्या चितेला मुखाग्नी दिला. विनायक आसलकर यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी आहे.

बातम्या आणखी आहेत...