आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआईचे दूध बाळासाठी खूप महत्वाचे आहे. कारण आईच्या दुधामध्ये सर्व आवश्यक पोषकतत्वे असतात, जे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून बाळाला निरोगी ठेवतात. आईच्या शरीरातील रोगप्रतिकारक घटक काही सामान्य विषाणू, जीवाणूंना अँटिबॉडीज बनवतात आणि त्या अँटिबॉडीज आईच्या दुधातून बाळाच्या शरीरात पोहोचवतात. त्यामुळे नवजात बाळांचे अनेक आजारांपासून संरक्षण होते तसेच या अँटिबॉडीज बाळाचे आयुष्यभर संरक्षणदेखील करतात. स्तनपान हे आईसाठी देखील फायदेशीर असते, अशी माहिती डॉ. छाया महाजन यांनी दिली.
जागतिक स्तनपान दिनानिमित्त दिव्य मराठी शी बोलताना त्या म्हणाल्या की, जेव्हा पहिल्यांदा कोणी आई बनते. तेव्हा मातृत्वाशी संबंधित प्रत्येक भावना हे पूर्णपणे नवीन असते. बाळासंबंधी आईला कोणत्याही कामाचा अनुभव नसतो. त्यामुळे आईला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यापैकी एक म्हणजे स्तनपान आहे. बाळाचे पहिले अन्न म्हणजे आईचे दूध आहे. ते बाळासाठी अमृतासमान असते. स्तनपानाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जगभरातील बाळांचे आरोग्य सुधारण्यासाठी जागतिक सप्ताहाची सुरुवात करण्यात आली आहे.
स्तनपान हे केवळ बाळासाठी नव्हे तर आईसाठीदेखील फायदेशीर आहे. प्रत्येक आईने आपल्या बाळाला जन्मानंतर काही महिने दूध पाजणे आवश्यक आहे. एका संशोधनानुसार स्तनपान करणारी आई प्रसूतीनंतर तिचे वजन सहज कमी करू शकते. त्याचबरोबर बाळाला स्तनपान केल्याने आईच्या शरीरात दररोज सुमारे पाचशे कॅलरीज बर्न होतात. ज्यामुळे शरीर तंदुरुस्त होते त्याचप्रमाणे स्तनपान करणाऱ्या स्त्रियांचे गर्भाशय इतरांपेक्षा अधिक लवकर आपल्या सामान्य स्थितीत पोहोचते. हे रक्तस्त्राव आणी अशक्तपणाचा धोका देखील कमी करते अशा महिलांमध्ये संसर्गाचा धोका ही कमी असतो.
माता आणि गाळामधील भावनिक बंधन
सतांपानामुळे आई आणि बाळाचे नाते दृढ होते. वैज्ञानिक आधाराखाली काही हॅप्पी हार्मोन्स आई आणि बाळाच्या भावनिक बंधाला दृढ करतात. प्रसुतीनंतर नैराश्यात जाण्याचे प्रमाण कमी होते. स्तनपानामुळे आत्मविश्वासाची भावना देखील वाढते, स्तनपान करणारी मुले कमी रडतात. असेही मत डॉ.छाया महाजन यांनी व्यक्त केले.
स्तनपान आणि रोगप्रतिबंध
स्तनपान करणाऱ्या स्त्रियांना स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, अस्थिरोग, मधुमेह आणि रक्तदाब यासारख्या आजाराचा धोका कमी असतो. तसेच आईचे दूध पिणाऱ्या बाळामध्ये अतिसार, बद्धकोष्ठता आणि अकाली नेट्रोटायझिंग एंटशेकोल्याटीस यासारख्या समस्या जास्त उद्भवत नाही. श्वसन प्रणाली देखील चांगली राहते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.