आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांस्य पदक:रस्सीखेच स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडूंना कांस्य पदक

मेहकरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रस्सीखेच स्पर्धेत महाराष्ट्र संघाने मिश्र गटात कांस्यपदक पटकावले आहे. पालघर येथे झालेल्या २४ व्या ‘राष्ट्रीय सब ज्युनिअर टग ऑफ वॉर’ अजिंक्यपद स्पर्धा २५ ते २९ ऑगस्ट दरम्यान समुद्र किनाऱ्यावर चिंचणी बीचवर पार पडली. आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा प्रशिक्षक श्रीराम निळे यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्ग पवार व सुशील सुरडकर यांची महाराष्ट्र संघामध्ये बुलडाणा जिल्ह्याचे दोन खेळाडूंची निवड झाली होती. त्यांनी या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघाच्या मिश्र गटात सहभाग घेतला होता.

अहमदनगर जिल्हा ‘टग ऑफ वॉर असोशिएशन’च्या सहकार्याने व महाराष्ट्र टग ऑफ वॉर असोसिएशन च्या अधिपत्याखाली व टग ऑफ वॉर फेडरेशन ऑफ इंडिया च्या नियमानुसार २३ वी सबज्युनियर व ज्युनिअर टग ऑफ वॉर (रस्सीखेच) राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन १५ ते १७ ऑगस्ट दरम्यान शिर्डी जिल्हा अहमदनगर येथे आयोजित करण्यात आले होते. बुलडाणा जिल्ह्याच्या संघाने राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेऊन वयोगट १७ वर्ष मुले संघाने सेमी फायनल पर्यंत पोचून खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.

यशस्वी संघाचे बुलडाणा जिल्हा राष्ट्रीय टग ऑफ वॉर असोसिएशनचे अध्यक्ष छत्रपती पुरस्कार प्राप्त शेषनारायण लोढे ,सचिव आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक श्रीराम निळे, योगेश शर्मा, राजकुमार शर्मा ,प्रेम टूनलाईट, नीलेश इंगळे, माधव मंडळकर, गजेंद्र देशमुख जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी विजय खेळाडूंचे कौतुक केले. खेळाडू आपल्या यशाचे श्रेय आई-वडील तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक श्रीराम निळे देतात.

बातम्या आणखी आहेत...