आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घसरण:बीएसईच्या स्मॉल कॅप, मिड कॅपमध्ये आतापर्यंत 4 % घट, तर सेन्सेक्समध्ये 2 टक्क्यांनी घसरण, नजीकच्या काळात बाजारात अस्थिरता येऊ शकते नवी

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीएसई स्मॉल कॅप आणि मिड कॅप निर्देशांकांनी या वर्षी आतापर्यंत बेंचमार्कपेक्षा कमी कामगिरी केली आहे. आतापर्यंत या निर्देशांकात ४ टक्के घसरण झाली आहे. तज्ज्ञांच्या मते अमेरिकेच्या फेडरल जनरलची कडक भूमिका आणि वाढत्या महागाईमुळे नजीकच्या काळात बाजारात अधिक अस्थिरता येऊ शकते.

अलीकडच्या काळात भूराजकीय तणाव, चलनवाढीची चिंता आणि विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची विक्री यासारख्या अनेक समस्यांना देशातील शेअर बाजाराला तोंड द्यावे लागत आहे, असे विश्लेषकांनी सांगितले.

बाजारात कमाल पातळीवर व्यवहार होत असताता घसरणीसाठी बाजाराला फक्त एकाच कारणाची गरज आहे आणि या वर्षात युक्रेन युद्ध, एफआयआयचीविक्रमी विक्री, जागतिक अर्थव्यवस्थेच्या विकासाचा वेग मंदावणे, महागाई अशा अनेक नकारात्मक गाेेेष्टी असल्याचे ट्रेडिंगाेचे संस्थापक पार्थ न्याती यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की स्मॉल कॅप आणि मिड कॅप निर्देशांकांमध्ये उच्च वाढ, उच्च परतावा आणि उच्च अस्थिरता यासारखी वैशिष्ट्ये असलेले स्टॉक असतात. बाजारातील घसरणीच्या काळात लहान आणि मिड कॅप निर्देशांक लार्ज कॅप निर्देशांकापेक्षा कमी कामगिरी करतात. बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक या वर्षी आतापर्यंत १०९५.९८ अंकांनी घसरला आहे, तर मिड कॅप निर्देशांक ६६६.१ अंकांनी घसरला आहे. त्या तुलनेत सेन्सेक्स या वर्षी २ मेपर्यंत १,२७७.८३ अंकांनी घसरला आहे.

व्याजदर, महागाई महत्त्वाचे घटक
बाजारातील तज्ज्ञांच्या मते अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची व्याजदर वाढ, महागाई हे घटक नजीकच्या काळातील बाजारातील अस्थिरतेस कारणीभूत ठरणारे प्रमुख घटक आहेत. रशिया-युक्रेन प्रश्नाचे अद्याप निराकरण झालेले नाही. याशिवाय, बाजाराच्या एकूण दिशेसाठी कंपन्यांची कमाई हा महत्त्वाचा घटक असेल. तसेच देशांतर्गत अर्थव्यवस्था पुढे जाण्यासाठी मान्सूनदेखील महत्त्वाचा घटक राहील.

बातम्या आणखी आहेत...