आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापेट्रोल, डिझेल व गॅससह जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करावेत, वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन पूर्ण करावे, ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यात यावे, अग्निपथ योजना तातडीने रद्द करावी, एस.सी. एसटीचा अनुशेष भरण्यात यावा, आदी मागण्यांसाठी बहुजन समाज पक्षाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व बसपाचे प्रदेश सचिव प्रभात खिल्लारे व जिल्हाध्यक्ष ॲड. डी. एम. भगत यांनी केले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. नंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात दिवसेंदिवस महागाईचा भस्मासूर वाढत आहे. गॅस पेट्रोल, डिझेल व इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. महागाईवर नियंत्रण ठेवण्यात यावे. केंद्र शासनाने नुकतीच युवकांसाठी अग्निपथ योजना आणली आहे. ही योजना युवकांचे भविष्य उध्वस्त करणारी आहे.
त्यामुळे ती रद्द करण्यात यावी, भोन येथे उत्खनन करून पर्यटन स्थळ बनवण्यात यावे, अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनात वाढ करावी यासह इतर मागण्या आहेत. आंदोलनात संतोष तायडे, ज्ञानदेव इंगळे, धीरज इंगळे, संघर्ष सुरडकर, दिलीप सरकटे, अरुण माळी, सुधीर गवई, शरद ब्राम्हणे, माणिकराव सिरसाट, अनिल आराख, दामोधर गवई, शालिग्राम गवई, नामदेव दाभाडे, विलास इंगळे, विजय वानखडे, श्रीकृष्ण दिवनाळे आदी सहभागी झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.