आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअर्थसंकल्पाने सर्वसामान्य माणसाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारा असा अर्थसंकल्प राज्य सरकारने सादर केला असल्याची माहिती भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. रविवार, दि.१२ मार्च रोजी भाजप जनसेवा संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला जिल्हा सरचिटणीस योंगेद्र गोडे, मोहन शर्मा, संतोष देशमुख, सागर फुंडकर, रघुनाथ खेर्डे, सिद्धार्थ शर्मा यांची उपस्थिती होती. कुळकर्णी यांनी कृषी विभाग शेतकरी मदत व पुनर्वसन फलोत्पादन पशुसंवर्धन जलसंपदा, जलसंधारण विभागाची कामे, द्वितीय अमृत महिला आदिवासी मागास वर्ग, ओबीसींसह सर्व समाज घटकांचा सर्व समावेशक विकासाकरिता ४३.०३६ कोटी रुपयांची तरतूद महिला व बालविकास विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग दिव्यांग कल्याण विभाग आदिवासी व अल्पसंख्याक विभाग कामगार गृहनिर्माणासाठी तरतुद करण्यात आली आहे.
तृतीय अमृत भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास विभागासाठी तरतूद सार्वजनिक बांधकाम विभाग ग्रामविकास व पंचायतराज नगर विकास रोजगार हमी योजना ५३.०५८ कोटी रूपये, चतुर्थ अमृत रोजगार निर्मिती उद्योग विभाग, वस्त्र उद्योग शालेय शिक्षण उच्च व तंत्र शिक्षण वैद्यकीय व औषध द्रव्य विभाग क्रीडा व पर्यटन विभाग ११.६५८ कोटी रूपये, पंचम अमृत पर्यावरण पूरक विकास वनविभाग उर्जाविभाग एकूण तरतूद १३.४३७ कोटी रूपये करण्यात आली आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांच्यावर कारवाई केली जाते. विरोधी आमदारांच्या मतदार संघातील निधी पळवला जातो. आमदार कोर्टात गेले. या प्रश्नांवर त्यांनी कोर्ट निर्णय देईल असे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.