आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाणा अपघात:रस्ता ओलांडणाऱ्या रिक्षाला भरधाव खासगी बसची धडक, रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
भरधाव बसची अॅपे रिक्षाला धडक, चालक जागीच ठार
  • धडक इतकी जोरदार होती की रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला

बुलडाण्यात शनिवारी अपघाताचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एक अॅपे रिक्षाचालक रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. त्याचवेळी एका भरधाव खासगी बसने त्या रिक्षाला जोरदार धडक दिली. धकड इतकी जोरदार होती की रिक्षाचालक किशोरचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपली आहे.

बुलडाण्यातील चिखली ते खामगाव रस्त्यावर शनिवारी सकाळी 8 वाजता भीषण अपघात घडला. या घटनेच्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या अॅपे रिक्षा चालक व्यक्तीचे नाव किशोर गजानन इंगळे असे होते. किशोर या रस्त्यावरून विरुद्ध दिशेने जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याने डिव्हायडरच्या मध्यभागी असलेल्या जागेतून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. पण, त्याच दरम्यान दुसऱ्या बाजूने एक भरधाव खासगी बस येत होती हे त्याला दिसलेच नाही. काही कळेल तोपर्यंत बसने अॅपे रिक्षाला इतकी जोरदार धडक दिली की किशोर बाहेर फेकल्या गेल्या. तो रिक्षातून थेट दुभाजकावर जाऊन आदळला.

धडक इतकी जोरदार होती की अॅपे रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. व्हिडिओमध्ये आसपास काही लोक सुद्धा थांबलेले दिसून आले. सर्व काही इतके वेगाने घडले की त्यांनाही काहीच पत्ता लागला नाही. आवाज आल्यानंतर मागे वळून पाहिले तेव्हा किशोरचा जीव जात होता. किशोर मूळचा चिखली तालुक्याचा रहिवासी आहे. तर सदरची खासगी बस ही पुणे ते नागपूरच्या दिशेने जात होती. या घटनेचा पोलिस सविस्तर तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...