आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा विस्फोट:जिल्ह्यात ६९० नवे कोरोना बाधित, ३०४ रुग्णांना सुटी; चार कोरोना बधितांचा मृत्यू

बुलडाणाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रशासनाचे त्रिसूत्री राबवण्याचे जिल्हावासियांना आवाहन, नियमांची अंमलबजावणी आवश्यक

जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत आजही भर पडली असून ६९० पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. मृतकांची संख्याही वाढतच आहे. त्यात चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये गोंधनपूर, ता. खामगाव येथील ६५ वर्षीय पुरूष, लासुरा, ता. शेगाव येथील ८५ वर्षीय पुरूष, सुभाषनगर चिखली येथील ५८ वर्षीय पुरूष व हिवरा आश्रम ता. मेहकर येथील ८५ वर्षीय पुरूष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ३०४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे पॉझिटिव्ह आलेले अहवाल :बुलडाणा शहर : ९५, बुलडाणा तालुका : जांब १, सुंदरखेड १, दहीद ४, गोंधनखेड २, पाडळी २, धाड ८, चांडोळ १, वालसावंगी १, अंबोडा २,सागवन १, दत्तपूर १, उबाळखेड १, गिरडा ३, मढ १, चिंचपूर १, डोंगरखंडाळा १, शिरपूर २, चिखली शहर : ५७, चिखली तालुका : किन्होळा १, शेलूद १, कोलारा १, टाकरखेड हेलगा २, उंद्री ४, कोळेगांव १, पेठ १, सवणा २, भालगाव ३, सोमठाणा २, कोनड ३, खैरव २, पळसखेड जयंती १, वैरागड १, इसरूळ २, अंचरवाडी १, अमोना १, रोहडा १, किन्ही नाईक २, काटोडा ३, बोरगांव काकडे २, शेलसूर २, खंडाळा ३, अमडापूर १, ढासाळवाडी ३, चांधई १, मलगी ९,नायगांव २, पांढरदेव २, इसोली १, दे. घुबे २,

मेहकर शहर : १०, मेहकर तालुका : सारंगपूर १, दौलत गव्हाण २, लोणी गवळी १, हिवरा आश्रम २, दे. माळी १, जानेफळ २, जळगाव जामोद शहर : ६, जळगाव जामोद तालुका : इस्लामपूर १, बोराडा १, आसलगांव १, नांदुरा शहर : २७, नांदुरा तालुका : निमगांव १, महाळुंगी २, माळेगांव गोंड १, आलमपूर २, नारखेड २, वडनेर ९, टाकळी २, धानोरा १, शेंबा १, पातोंडा १, मोताळा तालुका : शेलगांव बाजार २, खरबडी १, महाल पिंप्री १, पिंप्री गवळी १, किन्होळा ६, पिं. देवी २, बोराखेडी ७, मोताळा शहर : २३, शेगाव शहर : ७४, शेगांव तालुका : माटरगांव १, गायगांव १, जलंब २, पहूरजिरा १, गौलखेड १, जवळा १, शिरजगांव निळे १, खामगाव शहर : ५५, खामगाव तालुका : मांडका १, लाखनवाडा ६, पिंप्री देशमुख १, सुटाळा बु १, जनुना १, आवार २, चिंचपूर ७, आंबेटाकळी २, पळशी १, शिर्ला नेमाने १, मलकापूर शहर : १९, मलकापूर तालुका : वाघुड १, नरवेल ३, घिर्णी १, दाताळा १, पिंपळखुटा १, माकनेर १, मोरखेड खु १, लासुरा ६, कुंड बु. २०, उमाळी १, वडजी १, वरखेड १, दुधलगाव १, लोणवडी ४,

सिं. राजा तालुका : झोटींगा १, भोसा २, रताळी ६, साखरखेर्डा ४, शिंदी १, वसंत नगर ७, हिवरा गडलिंग १, शेलगांव राऊत १, ताडशिवणी १, दे. कोळ १, सावखेड तेजन २, दे. राजा शहर : २५, दे. राजा तालुका : दगडवाडी १, सुरा १, दे. मही ३, पिंप्री आंधळे १, सिनगांव जहाँ. १०, खल्याळ गव्हाण १, संग्रामपूर तालुका : लोहगांव १, लाडनापूर १, निवाणा १, लोणार शहर : ८, लोणार तालुका : हिरडव १, मूळ पत्ता हरणखेड ता. बोदवड १, कसुरा ता. बाळापूर १, माळेगांव ता. तेल्हारा १, काजीखेड ता. बाळापूर १,३०४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. यामध्ये बुलडाणा : अपंग ७, मुलींचे वसतीगृह ७२, कोविड हॉस्पिटल ५, आशीर्वाद हॉस्पिटल ७, सिद्धिविनायक हॉस्पिटल ४, सहायोग १, खामगाव : ६३, चिखली : ४२, दे. राजा : ३०, लोणार : ८, जळगाव जामोद : ९, सिं. राजा : १, मोताळा : ४, संग्रामपूर : ४, मेहकर : २३, मलकापूर : ४, शेगाव : २०.तसेच ३६१७ स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल १६७२५८ आहेत.

होम क्वाॅरंटाइन असणाऱ्या रुग्णांवर आता राहणार वचक, पालिकेची १६ पथके
कोरोना या आजारामुळे बाधित रुग्णाच्या संख्येमध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्या अनुषंगाने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून व कोरोना विषाणूचा फैलाव होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शहरातील होम क्वाॅरंटाइन करुन ठेवलेल्या रुग्णांवर वचक ठेवण्यासाठी येथील नगर परिषदेने प्रभाग निहाय एकूण सोळा पथके तयार केली आहेत. या पथकात दोन आशा सेविका व वाॅर्डप्युन यांची नियुक्ती केली आहे. तसेच या पथकावर नियंत्रण ठेवण्यासाठी डॉ. श्रीमती खर्चे व डॉ. श्रीमती देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
होम क्वाॅरंटाइन बाबतची परवानगी सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्राप्त झालेल्या रुग्णाच्या घरावर स्टीकर लावणे, त्या गृहअलगीकरण केलेल्या रुग्णांना बाहेर पडू न देणे व तो बाहेर पडणार नाही याची दक्षता घेणे. तसेच त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे. गृहअलगीकरण केलेले रुग्ण बाहेर पडल्याचे दिसून आल्यास त्याची माहिती नियंत्रण अधिकारी यांना देणे. तसेच फौजदारी कार्यवाही करणे. अशी जवाबदारी नियंत्रण पथकावर देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...