आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कधी नव्हे इतका रुद्रावतार कोरोनाने जिल्ह्याला गुरुवारी दाखवला. तब्बल ८८५ अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले तर तिघांचा मृत्यू झाल्याने प्रशासनासह आराेग्य विभागाच्या पायाखालची वाळू सरकली. मार्च महिन्यातल्या अठरा दिवसात ३६ कोरोना बाधितांना मृत्यूने कवटाळले आहे. सातत्याने वाढणाऱ्या या संसर्गाला अाळा घालण्याचे माेठे आव्हान प्रशासनासमोर अाहे. हे आव्हान पेलण्यात ते अपयशी ठरत अाहे, अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली अाहे. संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सायंकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत पार्सलची व्यवस्था सुरु ठेवली आहे. पार्सल दारुचीच जास्त होत असल्याने किराणा दुकान मात्र पाचनंतर कुलूप बंद दिसते. बार सुरु, हॉटेल सुरु अन् भाजीपाला, किराणा दुकान बंद असल्याने जिल्हा प्रशासनाचा ठोकताळा न समजण्यासारखा आहे. जिल्ह्यात शेतकरी, मजूर वर्ग मोठा आहे. दररोज लागणाऱ्या गरजेच्या वस्तू घरी न्याव्या लागतात. सकाळी संचारबंदी शिथिल झाल्यानंतर दुकाने उघडतात तेव्हा या मजूर वर्गाला घराबाहेर पडावे लागते. त्यानंतर सायंकाळी पाच वाजेनंतरच घरी परतावे लागते. त्यामुळे सकाळी खरेदी करु शकत नाही अन् आठवडी बाजार बंद असल्याने त्या दिवशी विकत घेऊ शकत नाही.
४४६० कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू
तीन मृत्यू झालेल्यांमध्ये शेंबा तालुका नांदुरा ७६ वर्षीय पुुरुष, छत्रपती नगर बुलडाणा येथील महिला, आदर्शनगर मलकापूर ६५ वर्षीय पुरुष आहेत. विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटरमधून ४३३ रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत १७२४५१ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत २३११६ कोरोना बाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तर ३८४७ अहवाल अजून प्रलंबित आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण २७८०५ कोरोना बाधित रुग्ण आहेत. जिल्ह्यात सध्या रूग्णालयात ४४६० कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत २२९ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.
खामगाव, बुलडाणा, मलकापूर तालुका हॉटस्पॉट
पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये बुलडाणा शहर व तालुका - ११९, खामगाव शहर व तालुका - १२९, शेगाव शहर व तालुका - ३१, दे. राजा तालुका व शहर - ८५, चिखली शहर व तालुका - ५१, मेहकर शहर व तालुका - १०, मलकापूर शहर व तालुका - १२४, नांदुरा शहर व तालुका - ८५, लोणार शहर व तालुका - २६, मोताळा शहर व तालुका - ३२, जळगांव जामोद शहर व तालुका - ८७, सिं. राजा शहर व तालुका - ९२ आणि संग्रामपूर शहर व तालुका - १४.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.