आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातीस तासांच्या मोजणी नंतर अमरावती पदवीधर मतदार संघातून विजयाची माळ धीरज लिंगाडे या बुलडाणा जिल्ह्याच्या नेत्याच्या गळयात पडली. जिल्ह्याला पदवीधर मतदार संघातून प्रथमच काँग्रेसच्या रुपाने एक आमदार मिळाला असून महाविकास आघाडीचीही प्रथमच या विजयाला किनार लाभली आहे. जिल्ह्यातील भाजपला मिळालेला हा मोठा धडा असून काँग्रेसला मात्र पुन्हा अच्छे दिन येण्याची स्वप्न नेत्यांना दिसू लागले आहे.
भाजपचे बोट धरुन आलेल्या शिंदे गटाला मात्र या विजयामुळे वचक बसला आहे. मात्र शिंदे गटाचे आ. संजय गायकवाड यांनी रणजीत पाटील यांनाच पराभवासाठी दोषी मानले आहे. ते संपर्कात असते तर दहा पंधरा हजार मते आपल्या कार्यकर्त्यांनी मिळवून दिली असती असे ते म्हणाले. वडील रामभाऊ लिंगाडे काँग्रेसमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेत आमदार झाल्यानंतर काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले धीरज लिंगाडे हे सुध्दा काँग्रेसमध्ये परतल्यानंतर आमदार झाले आहेत. तर भाजपने दोन टर्म पासून उपरा उमेदवार आणून उभा केला अन् कार्यकर्त्यांनीही त्यालाच निवडून दिले. परंतु, भाजपचेच निष्ठावंत बाजूला सारले गेल्यामुळे भाजप निष्ठावंतांनी यावेळी मतदान न करता भाजपलाच जागा दाखवून दिली.
जल्लोष काँग्रेसचा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी या विजयाचा जल्लोष केला. आ.धीरज लिंगाडे यांच्या घरासमोर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलडाण्याला साधा सरळ सात्विक आमदार मिळाला असून भाजपला उतरती कळा लागल्याची प्रतिक्रिया नोंदवली. शहराध्यक्ष दत्ता काकस यांचे नेतृत्वातही जयस्तंभ चौकात फटाके फोडून गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.