आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा//"महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - महाराष्ट्र अंतर्गत राज्यामध्ये विहित मुदतीत मजुरी अदायगी करण्यात जिल्हा राज्यात अग्रेसर असल्याने बुलडाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांचा राज्यस्तरावर गौरव करण्यात आला. जिल्हयामध्ये जे मजूर श्रमाचे काम करण्यास तयार आहेत, अशा मजुरांना गावातच अकुशल स्वरूपाचा रोजगार उपलब्ध करून देण्याकरता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र अधिनियम-२००५ राबवण्यात येत आहे.
सोबतच गावांमध्ये शाश्वत स्वरूपाची मालमत्ता निर्माण करणे व पात्र लाभार्थ्यांना निकषानुसार वैयक्तीक स्वरूपाची कामे देऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचावणे हा उद्देश आहे.या योजनेमध्ये मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांची मजुरी ठरवून दिलेल्या वेळेतच ८ दिवसांत मजुरी मजुरांच्या बँक खात्यामध्ये जमा करणे बंधनकारक केलेले आहे. जिल्ह्यात मागील सतत ४ वर्षापासुन मजुरांना त्यांची मजुरी ८ दिवसांत अदा करण्यात येत आहे.
या बाबतीत महाराष्ट्रात जिल्हा अग्रेसर असुन या उत्कृष्ट कामाची दखल राज्यस्तरावर घेण्यात येऊन ३ मार्च, २०२३ रोजी यशवंतराव चव्हाण केंद्र मुंबई येथे राज्यपाल ,मुख्यमंत्री व मा. मंत्री (रोहयो), यांचे हस्ते व राज्याचे अप्पर मुख्य सचिव (रोहयो) आयुक्त मनरेगा नागपूर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी एच. पी. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, पंचायत समिती चिखली, खामगाव, संग्रामपूर चे गट विकास अधिकारी, जिल्हा एम आय एस समन्वयक सचिन श्रीवास्तव व इतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) मोहोड, उपजिल्हाधिकारी (रोहयो) माचेवाड यांचा सत्कार केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.