आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलडाण्यात सापडले हेमाडपंथी मंदिर:शारंगधर नगरीला लागून असलेल्या शेतात आढळले हेमांडपंथी मंदिराचे अवशेष; पाहण्यासाठी नागरिकांची तुफान गर्दी

मेहकर (बुलडाणा)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एैतिहासिक महत्व असलेल्या शारंगधर नगरी अर्थातच मेहकरला अध्यात्मिक वारसाही आहे. कंचनीच्या महालाची शीळ अजुनही जानेफळ रस्त्यावर कानावर गुंजत ना. घ. देशपांडेंना काव्यातुन गुंजली आहे. या एैतिहासिक शहराच्या आसपासच्या ग्रामीण भागालाही असेच एैतिहासिक महत्व आहे. त्यात आता एक नवीन भर हेमांडपंथील मंदीराचे अवशेष सापडल्याने पडली आहे. पैनगंगेच्या तिरावर एका शेतात सापडलेल्या या अवशेषामुळे इतिहास उलगडण्याचा कयास असून या करता पुरातत्व विभागाने लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.

मेहकर येथे जानेफळ रोड वरील अनिकट परिसरात अनिल माधव इंगळे हे आपलया शेतामध्ये काम करत असताना काही हेमाडपंथी दगड दिसून आले. त्यामुळे पुढे कायच्या अभिलाषेने अनिल इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी खोदकाम सुरूच ठेवले. त्यावेळी भव्य दिव्य असा नंदी दिसून आला. हळू-हळू दगडाच्या कोरीव पायऱ्या सुद्धा आढळून आल्या. जाणकारांच्या मते या ठिकाणी हेमाडपंथी मंदिर असलेच पाहिजे.

इंगळे यांच्या शेतामध्ये सध्या खोदकाम सुरू आहे. पैनगंगेच्या तीरावर हे हेमाडपंथी मंदिर शेकडो वर्षांपूर्वी नदीच्या पाण्यामुळे जलमय झाले असल्याचे जाणकार सांगत आहेत. जमिनीपासून 20 फूट खाली या हेमाडपंथी मंदिराचे अवशेष आढळून आले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी परिसरात गर्दी केली. खोदकाम अजूनही सुरूच असून यात आणखी काय हाती लागेल याची उत्सुकता आता स्थानिकांना होत आहे. मेहकर नगर परिषदेचे उपाध्यक्ष जयचंद बाठिया, सभापती माधव तायडे, सभापती ओम सौभागे ,समाधान सास्ते, वैभव ऊमाळकर ,विष्णू बाजड, गजानन चांगाडे पत्रकार संतोष मलोसे यांच्यासह माळी पेठ परिसरातील नागरिकांनी इंगळे यांच्या शेतामध्ये दिसून आलेल्या हेमाडपंथी मंदिराचे अवशेषाची पाहणी केली. दरम्यान कुतुहलापोटी अजुनही मंदीर बघण्यासाठी नागरीक येत आहेत.

मेहकर शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. शहरामध्ये शेकडो वर्षे जुना कंचनीचा महाल आहे. ऐतिहासिक असे बालाजी मंदिर आहे. ओलांडेश्वर मंदिराच्या बाजूला राम राज्यातील ऐतिहासिक असे कुंड, दगडी सभामंडप आहे. मेहकर शहराच्या मध्यभागी पाचपीर बाबाची दर्गा तर खालचे स्टॅन्ड येथे शेकडो वर्षे जुने दगडाचे सभागृह आहे. त्यात आणखी आणखी एका ऐतिहासिक वारसाची भर पडली आहे. पुरातत्व विभागाने याची पाहणी केल्यास आणखी माहिती समोर येईल.

बातम्या आणखी आहेत...