आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅमेऱ्यात कैद झाला दरोडा अन् खून:बुलडाण्यात पैसे न दिल्याने दोन दरोडेखोरांनी मिळून इलेक्ट्रॉनिक दुकान मालकावर तलवारीने सपासप केले वार

बुलडाणा12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाण्यात लुटमार आणि खुनाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चिखली येथे दरोडेखोरांना रोख रक्कम देण्यास नकार दिल्याने एका 55 वर्षीय इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायिकाचा तलवारीने वार करून खून करण्यात आला. व्हिडिओ फुटेजच्या आधारे पोलिसांनी आता आरोपींचा शोध सुरू केला आहे.

बुलडाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद इलेक्ट्रॉनिक्सचा मालक कमलेश पोपट असे मृत दुकानदाराचे नाव आहे. कमलेश हे दुकान बंद करून घराकडे निघाले असताना मंगळवारी रात्री दहा वाजता ही घटना घडली. कमलेशवर हल्ला करणाऱ्या दोन्ही दरोडेखोरांनी मास्क घातले होते.

या घटनेत आनंद इलेक्ट्रॉनिक्सचे मालक कमलेश पोपट यांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेत आनंद इलेक्ट्रॉनिक्सचे मालक कमलेश पोपट यांचा मृत्यू झाला आहे.

पैसे न दिल्याने प्राणघातक हल्ला
सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक आरोपी डेस्कच्या मागे बसलेल्या मालकाकडे जाताना दिसत आहे. त्यानंतर तो ताबडतोब बंदुकीसारखे दिसणारे शस्त्र काढतो आणि मालकाकडे निर्देश करतो. तर दुसरा आरोपी मागून तलवार काढतो.

सुरुवातीला कमलेश हल्लेखोरांशी लढण्याचा प्रयत्न करतो. यानंतर एका आरोपीने त्याच्यावर तलवारीने अनेक वार केल्याचे दिसत आहे. व्हिडिओ फुटेजच्या आधारे आरोपींनी रोख रकमेची मागणी केल्याचा पोलिसांना संशय आहे.

बातम्या आणखी आहेत...