आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वॅब न देताच कोरोना पॉझिटीव्ह:स्वॅब दिलाच नाही आणि कोरोनाचा रिपोर्ट आला पॉझिटीव्ह! बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा येथील धक्कादायक घटना

बुलडाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • टेस्ट केलीच नाही आणि अहवाल आला कोरोना पॉझिटीव्ह

कोरोना चाचणीसाठी स्वॅब दिल्यानंतर रिपोर्ट पॉझिटीव्ह येणार की निगेटीव्ह अशी धडधड प्रत्येकाची होत असते. पण, बुलडाण्यात एका व्यक्तीने कथितरित्या स्वॅब न देताच त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याचा अजब प्रकार घडला आहे. मोताळा येथील कोविड केंद्रावर स्वॅब तपासणीसाठी पाठवलाच नाही आणि संबंधित व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचा मेसेज आला.

मोताळा येथे सहकार विद्या मंदिर येथे कोरोनाच्या चाचण्यासाठी स्वाब घेण्यासाठी कोविड केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्या कोविड केंद्रावर मोताळा येथील एका व्यक्तीस खोकला जाणवत असल्याने गुरुवारी 25 फेब्रुवारीला ती व्यक्ती मोताळा येथील सहकार विद्या मंदीर येथील कोविड केंद्रावर स्वाब तपासणीसाठी गेले होते. तेथे त्या व्यक्तीची नावनोंदणी करून घेत त्यांना साडेअकरा वाजता स्वॅब देण्यासाठी बोलावण्यात आले होते. तेथून ती व्यक्ती घरी आली.

संबंधित व्यक्तीने 'दिव्य मराठी'शी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर सदर व्यक्ती आपल्या दैनंदिन कामात व्यस्त झाली होती. परत त्यांना खोकला किंवा इतर कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवला नाही. त्यामुळे त्यांनी स्वॅब तपासणीसाठी दिलाच नाही. परंतु, 5 मार्च रोजी मोताळा येथील सहकार विद्या मंदिर येथील कोविड केंद्रातून सदर व्यक्तीस एका महिला कर्मचाऱ्याचा फोन आला. त्यांनी सदर व्यक्तीस तुमचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे सांगीतले. हे ऐकताच संबंधित व्यक्तीच्या पायाखालची जमीन सरकली. कोणत्याही प्रकारचा स्वॅब तपासणीसाठी न देता अहवाल पॉझिटिव्ह आला. हे शक्यच नसल्याचे म्हणत त्यांनी महिला कर्मचाऱ्यालाच सुनावले.

यानंतर त्यांनी यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी या घडलेल्या प्रकाराची चर्चा केली. त्यावर स्पष्टीकरण देताना केंद्राने म्हटले की ही व्यक्ती परत 27 फेब्रुवारीला आलाी होती. त्याच दिवशी त्यांचा स्वॅब घेतल्याचा दावा केला. या कोविड केंद्रात किती प्रमाणात हलगर्जीपणा चालत आहे हे यावरून सिद्ध होत आहे तर आधीही असे प्रकार येथे घडले असतील अशी शंका येथील काही नागरीक व्यक्त करीत आहे. आता त्या व्यक्तीने खरंच स्वॅब दिला नव्हता? त्याच्या दाव्यात आणि आरोग्य केंद्राच्या दाव्यात किती तथ्य आहे याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी थोड्याच वेळात स्पष्टीकरण देणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...