आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना आमदाराची जीभ घसरली:'मला जर कोरोना विषाणू मिळाले असते, तर देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबले असते...'

बुलडाणा9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना काळात राजकारण करू नये

सध्या राज्यात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारणही तापले आहे. कोरोना चाचणी, लसीकरण आणिर रेमडेसिवीरच्या काळाबाजारावरुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कुठल्याही स्तराला जाऊन टीका करत आहेत. अशाच प्रकारची टीका शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे.

कोरोनावरुन सुरू असलेल्या राजकाणावरुन बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी विरोधकांवर खातल्या पातळीवर टीका केली. ते म्हणाले की, 'सध्या राज्यासह देशभर कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. पण,विरोधीपक्ष मदत करायचे सोडून राजकारण करत आहे. मला जर कोरोना विषाणू मिळाले, तर देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबेन,' असे संजय गायकवाड म्हणाले. तसेच, यावेळी गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांचा एकेरी भाषेतही उल्लेख केला.

कोरोना काळात राजकारण करू नये
संजय गायकवाड पुढे म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकार राज्यसरकारला मदत कराण्याऐवजी बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळला मदत करत आहे. गुजरातला इंजेक्शन मोफत दिले. जर माणसेच जिवंत राहिली नाही तर तुम्हाला मतदान कोण करणार...? तुम्ही सरकार पाडायला निघालात, पण आधी माणसे जिवंत ठेवा, मग राजकारण करा, असे गायकवाड म्हणाले.

संजय गायकवाड यांच्या या वक्तव्याला भाजपकडून विरोध करण्यात आला आहे. भाजप प्रदेश सदस्य आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांनी गायकवाड यांच्या वक्तव्यावर पोलिसांनी कारवाई करावी आणि त्यांना अटक करावी अशी मागणी केली. तसेच, कारवाई न केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, पोलिस जबाबदार असतील, असेही म्हणाले.

विजयराज शिंदे यांची प्रतिक्रिया

बातम्या आणखी आहेत...