आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांची कार्यशाळा:बुलडाणा अर्बन, महाराष्ट्र बांबू फाउंडेशन जिल्ह्यामध्ये उभारणार बांबू उद्योग

बुलडाणा13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन व बुलडाणा अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी यांच्या संयुक्त उपक्रमातून बुलडाणा जिल्ह्यात सुरु होणार बांबू उद्योग विकासाचे नवीन पर्व सुरु होणार आहे. महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.गिरीराज यांनी बुलडाणा अर्बनच्या मुख्यालयास भेट दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी बांबू उद्योग उभारण्याचा दृष्टीकोन भाईजींनी व्यतीत केला.

या भेटीत विदर्भ व मराठवाड्यात बांबू उद्योगाचा विकास कसा करता येईल तसेच जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी बांबू शेती कशी करावी व कोणते रोप वापरावे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच पाश्चात्य देशांमधे बांबू हे प्लास्टिकला कसे पर्याय ठरु शकते व त्या देशांमधे बांबूचा पेरा किती वाढला आहे. याबाबत काही लघु चित्रफीत देखील दाखवण्यात आल्या. बुलडाणा जिल्हयात बांबू पासुन तयार होणा-या वस्तुंबाबतही चर्चा करण्यात आली. बुलडाणा जिल्हयात बांबू पासुन वस्तु तयार करणाऱ्या बुरुड समाज व सुतारी काम करणाऱ्या वर्गास सोबत घेवुन बांबू पासुन वस्तु तयार करण्याचे चार महिन्यांचे प्रशिक्षण चंद्रपूर किंवा त्रिपुरा (नॉर्थईस्ट) येथे देण्याबाबतही चर्चा करण्यात आली. बुलडाणा अर्बन व महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन बुलडाणा जिल्हयात बांबू उद्योग उभारण्यासाठी बांबू लागवड करणे व शेतकऱ्यांना बांबू लागवड करण्यास प्रवृत्त करणेसाठी संयुक्तपणे काम करणार असुन याबाबत लवकरचजिल्हयातील शेतकऱ्यांची एक कार्यशाळा घेण्यात येणार आहे असे बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...